बुलडाणा: विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी; सिंदखेड-राजाचे नाझेर काझी यांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 01:45 PM2020-05-19T13:45:59+5:302020-05-19T13:47:42+5:30
बुलडाणा: विधान परिषदेच्या जागेसाठी नाझेर काझी यांची चर्चा आहे.
Next
href='https://www.lokmat.com/topics/buldhana/'>बुलडाणा: विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत जून महिन्यात संपत असून यातील एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘फिल्डींग’ लावण्यात येत असल्याची विश्वसनिय माहिती प्राप्त झाली आहे. प्रामुख्याने विदर्भात काहीशा कमकुवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्याच्या दृष्टीकोणातून बुलडाणा जिल्ह्याला एक जागा मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मनिषा असल्याचे समोर येत आहे. त्यानुषंगाने सिंदखेड राजाचे माजी नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.वास्तविक, साहित्य, कला, विज्ञानासह विविध क्षेत्राताली तज्ज्ञ व्यक्तींची विधान परिषदेच्या १२ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्याचे अधिकार हे राज्यपालांना आहे. राज्यपालांचा तो स्व विवेकाधीन अधिकार आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात यावर सध्या जाणकारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून अनुषंगीक सदस्यांच्या नावाचा प्रस्तावही राज्यपालांकडे जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.मात्र बुलडाण्यात या १२ जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांची वर्णी लागावी अशा दृष्टीने प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. काझी हे गेल्या सहा पंचवार्षिक पासून सिंदखेड राजा पालिकेचे सदस्य असून, दहा वर्षे सलग उपनगराध्यक्ष राहीलेले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ वर्षे जिल्हा कार्याध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा राजकीय प्रवासही त्यांनी केला आहे. त्यामुळे यंदा राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेवर त्यांची वर्णी लागावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यास विदर्भातील राष्ट्रवादी कांग्रेसची ताकद वाढण्यास मदत मिळेल. काझी यांना मोठा राजकीय वारसाअॅड. नाझेर काझी यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा स्व. एन. झी. काझी यांना स्व. इंदिरा गाधी, स्व. यशवंतराव चव्हाण यांची पाठराखण होती. स्व. दादासाहेब कन्नमवार, स्व. वसंतदादा पाटील, स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निकटवर्तीयामध्ये काझी कुटुंब गणल्या जायचे. सिंदखेड राजा परगण्याचेही ऐतिहासिक संदर्भही काझी कुटुंबियांशी जुळलेले आहेत. यासोबतच काझी यांचे सातत्यपूर्ण राजकीय क्षेत्रातील काम पाहता त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या रुपाने मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीला विधान परिषदेचे सदस्यत्व मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.