बुलडाणा :  नऊ हजार नागरिकांना स्वगृही परतण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:13 PM2020-05-22T12:13:58+5:302020-05-22T12:14:38+5:30

स्वगृही परत जाऊ इच्छिणाºया नऊ हजार ५८७ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने परवागनी दिली आहे.

Buldana: Nine thousand citizens allowed to return home | बुलडाणा :  नऊ हजार नागरिकांना स्वगृही परतण्यास मुभा

बुलडाणा :  नऊ हजार नागरिकांना स्वगृही परतण्यास मुभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत दोन महिन्याच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखांच्या आसपास नागरिक परजिल्ह्यातून तथा राज्यातून स्वगृही परतले आहेत. दरम्यान, जिल्हास्तरावरून महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातून तथा पाच राज्यातून स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तथा स्वगृही परत जाऊ इच्छिणाºया नऊ हजार ५८७ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने परवागनी दिली आहे.
यातील बºयाच व्यक्ती स्वगृही परतल्या असून प्रत्यक्षात किती जण घरी पोहोचले आहेत, याचा आढावाही सध्या जिल्हा प्रशासन घेत आहेत. महाराष्ट्रातील २५ पेक्षा अधिक जिल्ह्यातून तब्बल चार हजार २८७ नागरिक बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले असून यात ६८७ उसतोड मजुरांचा समावेश आहे. तर कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेल्या एकट्या पुणे जिल्ह्यातून एक हजार ६७९ नागरिकांना बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतण्यास परवानगी देणत आली आहे. रेड झोनमधील जळगाव खांदेश जिल्ह्यातून ५७१, कोल्पापूरमधून १०८, नंदूरबारमधून २७, वर्ध्यातून ४२, लातूरमधून १६२, नाशिक मधून ५८, जालन्यातून ६७,धुळे जिल्ह्यातून १००, भंडाºयातून ३७, अकोल्यातून सात, नागपूरमधून १४८, औरंगाबादमधून १२७, सोलापूरमधून ९५ तर यवतमाळ जिल्ह्यातून ५४, गडचिरोलीतून चार, नांदेडमधून ६५ या प्रमाणे नागरिकांना बुलडाणा जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यता आली आहे.
दुसरीकडे शासनस्तरावरून ही परवानगी देण्यात आली असली तरी अनधिकृतस्तरावरही बरेच नागरिक जिल्ह्यात स्वगृही परतले असून त्यांच्यामुळे आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाचा उद्रेक बुलडाणा जिल्ह्यात नियंत्रित होता. मात्र आता त्याची व्याप्ती वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातही पुण्या, मुंबईतून मजूर गावी परत येत आहेत. अलिकडील काळात सापडलेले पाच रुग्ण हेही अशाच महानगरातून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता एक प्रकारे समुह संक्रमणाचा धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त होत आहे.
 
गुजरातमधील ५,११० जणांना परवानगी
 गुजरात राज्यातून बुलडाण्यात येण्यासाठी पाच हजार ११० जणांना परवानगी देण्यात आली आहे. हिमाचलमधील २३ जण पूर्वीच परतले असून राजस्थानमधील ८४ जणांनीही घर गाठले आहे. दिल्लीतील ४४ जणापैकी बरेच जण परतेले आहेत. सध्या दररोज जवळपास दीड हजार नागरिकांना परवानगी देण्यात येत असून पुण्या, मुंबईत जावून परत येण्यसाठी परवानगी मागणाऱ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. सकाळ पासून सायंकाळपर्यंत सध्या परवानगी देण्याचे काम सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

Web Title: Buldana: Nine thousand citizens allowed to return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.