बुलडाणा: कार-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:48 AM2018-03-12T01:48:00+5:302018-03-12T01:48:00+5:30
चिखली : मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे वाहन चालवून कार चालकाने समोरून येणा-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी. ११ मार्च रोजी दुपारी मेहकर फाट्यानजीक ही घटना घडली. यात येवता येथील ६५ वर्षीय भाऊराव रामराव बानकर यांचा मृत्यू झाला असून, गंभीर जखमी शिवाजी त्र्यंबक काळेला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे वाहन चालवून कार चालकाने समोरून येणा-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी. ११ मार्च रोजी दुपारी मेहकर फाट्यानजीक ही घटना घडली.
यात येवता येथील ६५ वर्षीय भाऊराव रामराव बानकर यांचा मृत्यू झाला असून, गंभीर जखमी शिवाजी त्र्यंबक काळेला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले.
भाऊराव बानकर व शिवाजी काळे दुचाकीवर (एमएच-२८-एजी५८३५) चिखलीकडे येत असताना समोरून आलेल्या कारने (एमएच-१५-एफव्ही ६४६४) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात भाऊराव बानकर जागीच ठार झाले. शिवाजी काळेंवर चिखलीत प्रथमोपचार करून बुलडाणा येथे हलविण्यात आले. अपघातास कारणीभूत कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सपकाळे सहकारी भगवान धूडसह घटनास्थळी दाखल झाले व कार चालक तुतलाजी गटलू शेलार (३२ रा. साईनाथ चौक, नाशिक) याला ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)