बुलडाणा : निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना ६८ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 10:57 AM2021-05-24T10:57:33+5:302021-05-24T10:57:48+5:30

Buldhana News : २३ मे रोजी पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Buldana: Penalty of Rs 68,000 for violating restrictions | बुलडाणा : निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना ६८ हजारांचा दंड

बुलडाणा : निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना ६८ हजारांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २३ मे रोजी पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
निर्बंधांना बगल देत कापड दुकान उघडून ग्राहकांची गर्दी जमविणाऱ्या अमर कलेक्शन कापड दुकान चालकांना पालिकेने ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.  यासोबतच आर. आर. ट्रॅव्हल्सलाही जवळपास आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या छोटे व्यावसायिक व पादचाऱ्यांनाही पालिका व पोलीस प्रशासनाने दंड ठोठावला आहे. दिवसभरात प्रशासनाने ६८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालिकेने एक पथकच नियुक्त केले आहे. दरम्यान हे पथक फिरतीवर असताना आठवडी बाजारात एक कापड दुकान उघडे असल्याचे दिसले. तेथे ग्राहकांचीही गर्दी होती. त्यामुळे पालिकेचे पथक तिथे धडकले. यावेळी दुकानामध्ये जवळपास ३५ ग्राहक आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या पथकाने दुकान चालकाकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई पालिकेने केली आहे. दरम्यान शहरात अन्य काही व्यावसायिकांनाही पालिकेने दंड ठोठावला आहे.

Web Title: Buldana: Penalty of Rs 68,000 for violating restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.