बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:45 AM2018-03-05T00:45:51+5:302018-03-05T00:45:51+5:30

जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या  पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून  जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उ त्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्‍या सर्व धार्मिक  परंपरेत त्यांच्यामते फगवा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला  जातो. यासाठी तब्बल पाच दिवस ते आपली कामे सोडून फगव्यात मग्न  असतात. 

Buldana: 'Phagwa festival' of tribals in Satpuda; Participants also participated in the election! | बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी!

बुलडाणा : सातपुड्यात आदिवासींचा ‘फगवा उत्सव’; लोकप्रतिनिधीही झाले सहभागी!

Next
ठळक मुद्देसातपुड्याच्या कुशीतील आदिवासींचा आनंदोत्सव

जयदेव वानखडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या  पारंपरिक, धार्मिक उत्सव तथा चालीरितीचे जतन करतात आणि त्यातून  जीवनाचा आनंद शोधतात. अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरुन असणार्‍या सर्व धार्मिक  परंपरेत त्यांच्यामते फगवा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला  जातो. यासाठी तब्बल पाच दिवस ते आपली कामे सोडून फगव्यात मग्न  असतात. 
यावर्षीही आदिवासी ग्राम उमापूर, काळमाटी, भिंगारा, चारबन, हनव तखेड, रायपूर, गारपेठ, निमखेडी, आदी गावांमध्ये हा फगवा उत्सव  मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. आपल्या पारंपरिक वाद्यांसह पारं परिक नृत्याने हे आदिवासी शहरवासीयांची मने वेधताना दिसतात.  जळगाव शहराच्या उत्तरेस सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आदिवासींची  गावे आहेत. या उत्सवाला हे आदिवासी शहरात येऊन भंगर्‍या मागतात  आणि फगवा गोळा करून नेतात.
यंदा उमापूर आणि कालमाटी येथील फगवा उत्सवातील आदीवासी  शहरात वेगवेगळ्या वेशभुषा करुन आणि महिला नृत्य करुन अन्नधान्य  व देणगी गोळा करीत आहे. होळी पेटल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून चार  दिवस गावागावात फिरुन आणि मोठमोठे ढोल वडवून घुंगरांच्या  तालावर थिरकत थिरकत आपल्या आदीवासी नृत्यकलाची  अविष्काराचे प्रदर्शन करतात. त्यानंतर त्यांच्या गावामध्ये ही अन्नधान्य  गोळा करतात. हे करत असताना कुणावरही त्यांची जबरदस्ती नसते.  प्रेमाणे जे दिले ते घ्यायचे याप्रमाणे जेवढे अन्नधान्य व पैसा अडका जमा  होता त्यामध्ये पाचव्या दिवशी गावामध्ये मोठा भंडारा केला जातो. यावर्षी  हा कार्यक़्रम ६ मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले.
काबाड कष्ट करुन जिवन जगणार्‍या आदीवासीच्या जीवनात हा उत्सव  मोठा आनंद निर्माण करतो. बायका मुले, म्हातारी माणसे मोठय़ा उ त्साहाने यात सहभाग होतात. 

आमदार हर्षवर्धन सपकाळांचाही सहभाग
संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्यातील पर्वतराजीत  पारंपरिक रहिवाशी असलेल्या आदिवासी बांधवांच्या फगवा या होळीनं तर ८ दिवस साजरा होणार्‍या उत्सवाचे चालठाना येथे आयोजन  करण्यात आले होते. या पारंपरिक उत्सवात आमदार हर्षवर्धन सपकाळ  हे आज सहभागी झाले. यावेळी सर्व आदिवासी समाज बांधवांनी  प्रवेशद्वारापासून वाजत गाजत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत  केले.

आदिवासी लोकांना परंपरा जिवंत राहावी, यातून लोकांचे निखळ  मनोरंजन व्हावे आणि आदिवासी बांधवांमधील एकोपा कायम रहावा,  यासाठी आम्ही काही ठरावीक मंडळी स्वत: पुढाकार घेऊन फगवा उ त्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. - 
-केशवसिंग राऊत  
शिक्षक उमापूर
 

Web Title: Buldana: 'Phagwa festival' of tribals in Satpuda; Participants also participated in the election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.