बुलडाणा पोलीस ५०९ गुन्हेगारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:37 AM2021-01-07T11:37:55+5:302021-01-07T11:38:12+5:30

Buldhana Police News ५०९ गुन्हेगारांच्या मागावर बुलडाणा पोलीस असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

Buldana police in search of 509 criminals | बुलडाणा पोलीस ५०९ गुन्हेगारांच्या शोधात

बुलडाणा पोलीस ५०९ गुन्हेगारांच्या शोधात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : खून, दरोडा तथा सराईत असलेल्या ५०९ गुन्हेगारांच्या मागावर बुलडाणा पोलीस असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान अद्यापही गंभीर गुन्ह्यातील २० जण फरार असून, स्थानिक गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात घरफोडीच्या घटनांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यातील ७५ टक्के आरोपींचा अद्याप शोध घेतल्या गेलेला नाही. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. यासोबतच संपलेल्या वर्षात  जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४५ खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ४२ प्रकरणात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले असले तरी तीन प्रकरणातील आरोपींचा शोध अद्याप घेतला गेलेला नाही. कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात जिल्ह्यात आपसी वादाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे जिल्ह्याचा क्राइम रेषोही वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतही वाढ झाली.


अवैध शस्त्रास्त्र विक्री रोखण्याचे आव्हान
गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पोलिसांनी धडक कारवाई करून आठ पिस्तूल, आठ तलवारी व १५ जिवंत काडतुस जप्त केले होते. यासोबतच एटीएसने साखरखेर्डा येथे पार्सलमधून आलेले गावठी पिस्तूल जप्त केले होते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मूळ सूत्रधार अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.  संपूर्ण वर्षात हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले होते.


स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत
जिल्ह्यातील गुन्ह्यात पोलीस दलाला ५०९ आरोपी हवे आहेत. यातील काही आरोपी हे दोन ते तीन वर्षापासून फरार आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गठित करण्यात आले असून, गोपनिय माहितीच्या आधारावर हे पथक अशा आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Web Title: Buldana police in search of 509 criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.