बुलडाणा: येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 01:55 PM2017-12-03T13:55:06+5:302017-12-03T13:55:12+5:30
बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता संपली असून येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
बुलडाणा : तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता संपली असून येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
शिरपुर हे सुमारे ५ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. सदर गावाला १ लाख ४६ हजार ८८५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु गावातील उपलब्ध साधनांच्या आधारे ३ हजार ३७५ हलार लिटर पाण्याची उपलब्धता होत होती. त्यामुळे गावक-यांना कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. अॅड.जयश्री शेळके यांनी जि.प.सदस्यपदी विराजमान होताच गावाच्या पाणीसमस्येला
प्राधान्यक्रमाने हाती घेतले. प्रशासकीय स्तरावर त्यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला तसेच राज्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेवून गावातील पाणीसमस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान येळगाव धरणावरून विहिरीसहीत ४८ लक्ष रूपयांची पुरक नळयोजना मंजुर होवून ई टेंडरींग, कार्यारंभ आदेश तथा सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता होवून पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. जि.प.सदस्या अॅड.जयश्रीताई शेळके यांनी वेळोवेळी सदर कामाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले.
शिरपूर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर जि.प.सदस्य अॅड.जयरीताई शेळके यांच्याहस्ते आज सदर पाणीपुरवठा योजनेचे जलपुजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय प्रभारी कार्यकारी अभियंता राजपूत, शाखा अभियंता मराठे, सरपंच पती विजय हिवाळे, उपसरपंच पती दिपक सुसर, ग्रा.पं.सदस्य सुभाष शेळके, ग्रा.पं.सदस्य शोभा शेळके, नंदू राजपूत, प्रदिप पाटील, केसरबाई
शेळके, शारदा शेळके, अलिवर पठाण, विजय चवंड, शरद सुसर, हरिष सुसर, नितीन सुसर, प्रमोद लेंभे, अमोल सुसर, विजय सुसर, अमोल सुसर, जितु गव्हाणे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.