बुलडाणा:  जिल्हा परिषदेच्या दहा शाळा होणार 'मॉडेल स्कूल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:25 PM2020-10-28T12:25:40+5:302020-10-28T12:25:48+5:30

Buldhana, School, Education Sector News जिल्ह्यात १० शाळा मॉडेल म्हणून पुढे येणार असून त्या इतरांसाठी आदर्श ठरतील. 

Buldana: Ten Zilla Parishad schools to be 'model schools' | बुलडाणा:  जिल्हा परिषदेच्या दहा शाळा होणार 'मॉडेल स्कूल'

बुलडाणा:  जिल्हा परिषदेच्या दहा शाळा होणार 'मॉडेल स्कूल'

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव/सिंदखेडराजा : राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा आदर्श करण्याच्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळा 'मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तीन तालुके वगळण्यात आले आहेत. मार्च २०२० मध्ये द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. काही निकषांच्या आधारावर साधारणतः प्रत्येक तालुक्यातून एक अशा ३०० शाळा निवडण्यात आल्या आहेत. निवडलेल्या आदर्श शाळा शक्यतो किमान इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळा आहेत. आवश्यक असल्यास त्यात आठवीचे वर्ग जोडण्याची मुभा असणार आहे. जिल्ह्यात १० शाळा मॉडेल म्हणून पुढे येणार असून त्या इतरांसाठी आदर्श ठरतील. 


अशी असेल आदर्श शाळा 

 आदर्श शाळा निर्मितीमध्ये तीन महत्त्वाचे भाग आहेत. यात भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश राहणार आहे. भौतिक सुविधा अंतर्गत स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुव्यवस्थित वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडासाहित्य, आयसीटी सायन्स लॅब, ग्रंथालय सुविधांचा समावेश आहे. 
 शैक्षणिक गुणवत्ता अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, वाचनावर भर, वाचनाचा सराव याशिवाय विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना राबवणे,स्वयं अध्ययनासोबतच गट अध्ययन यासारखे कार्यक्रमही यानिमित्ताने राबविले जाणार आहेत. 

Web Title: Buldana: Ten Zilla Parishad schools to be 'model schools'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.