बुलडाणा : शेंदुर्जनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:34 IST2018-02-26T01:34:42+5:302018-02-26T01:34:42+5:30
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जन येथे अज्ञात चोरट्यांनी २४ फेब्रुवारी रोजी रात्री इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून २६ हजार ८00 रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. सोबतच बँकही फोडण्याचा प्रयत्न केला.

बुलडाणा : शेंदुर्जनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
ठळक मुद्देचोरट्यांनी रात्री १ वाजता बसस्थानकावरील इलेक्ट्रिकल दुकान फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जन येथे अज्ञात चोरट्यांनी २४ फेब्रुवारी रोजी रात्री इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून २६ हजार ८00 रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. सोबतच बँकही फोडण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी मध्यरात्री समाधान आबा सानप यांचे बसस्थानकावरील दुकान चोरट्यांनी रात्री १ वाजता इलेक्ट्रिकल दुकान फोडले. त्यातील सेटटॉप बॉक्ससह नगदी रोख रक्कम चोरून नेली. त्याचबरोबर महाराष्ट्र मल्टी को.क्रे. सोसायटीही फोडण्याचा प्रयत्न केला. सानप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.