बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:41 AM2018-04-09T01:41:52+5:302018-04-09T01:41:52+5:30
बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून दोघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी तालुक्यातील चौथा येथे घडली. या प्रकरणातील महिला व पुरुषास गंभीर अवस्थेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून दोघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी तालुक्यातील चौथा येथे घडली. या प्रकरणातील महिला व पुरुषास गंभीर अवस्थेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
बुलडाणा तालुक्यातील चौथा येथील सुरेंद्र दिनकर मोरे (वय ३५) विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. शेजारील गावातील विवाहित स्त्रीसोबत सुरेंद्रचे प्रेमसंबंध असून, तिलाही दोन मुले आहेत. गेल्या एक वर्षापासून कुटुंबाला सोडून हे दोघेही बुलडाणा येथे राहत होते. सुरेंद्रचा पेंटिंगचा व्यवसाय आहे. दरम्यान, महिलेला तिच्या लेकरांची आठवण आल्याने २६ मार्च रोजी ती गावी गेली होती.
त्यानंतर २८ मार्च रोजी तिच्या ९ वर्षीय मुलाचा मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळला होता. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र व त्याच्या प्रेयसीने मुलाचा खून केल्याचा संशय आल्याने दोघांनाही धाड पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी सुरू करण्यात आली.
दरम्यान, ८ एप्रिल रोजी सुरेंद्र व त्याच्या पे्रयसीने चौथा गावाजवळील एका टेकडीवर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच सुरेंद्रचे वडील गावक-यांसह घटनास्थळी पोहोचले. तत्काळ दोघांनाही बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुरेंद्र मोरेचे विवाहित स्त्री सोबत अनैतिक संबंध आहेत. सदर महिला चौथा येथे जाऊन तिच्या मुलाला भेटली. त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला. या प्रकरणाच्या तपासकामी सुरेंद्र व महिलेची साक्ष घेण्यात आली होती. रविवारी या दोघांनीही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
- संग्राम पाटील,
ठाणेदार, धाड पोलीस स्टेशन