बुलडाणा: व्हीसीद्वारे जि.प.च्या अर्थसंकल्पास कार्याेत्तर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:44 AM2020-05-13T10:44:26+5:302020-05-13T10:44:34+5:30

जिल्हा परिषदेच्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासही या एक प्रकारच्या ऐतिहासिक सभेत कार्याेत्तर मंजुरीही मिळवली.

Buldana: VC's post-work approval of ZP's budget | बुलडाणा: व्हीसीद्वारे जि.प.च्या अर्थसंकल्पास कार्याेत्तर मंजुरी

बुलडाणा: व्हीसीद्वारे जि.प.च्या अर्थसंकल्पास कार्याेत्तर मंजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या इतिहासात व्हीसीद्वारे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पारपडली. दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाची आपतकालीन स्थिती उद्भवल्यानंतर जि. प. सिईओंनी कायद्याच्या चौकटीत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून मंजूर केलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासही या एक प्रकारच्या ऐतिहासिक सभेत कार्याेत्तर मंजुरीही मिळवली.
त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागले. ऐरवी निवडणुका तथा तत्सम बाबीमुळे बऱ्याचदा जि. प. सिईओंनी त्यांच्या अधिकारात अर्थसंकल्प मंजूर करून नंतरच्या बैठकीत त्यास कार्याेत्तर मंजुरी घेतली होती. परंतू यावेळचा हा क्षण काही औरच होता.
जिल्हा परिषदचे सर्व सदस्य हे १३ ही पंचायत समित्यांच्या व्हीडीओ कॉन्फरसींग सेंटरमध्ये बसून त्यांनी या सर्वसाधारण सभेत सहभाग घेतला तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस जिल्हा परिषदेतील व्हीसी सेंटरमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमल बुधवत, जिल्हा परिषद सीईओ षण्मुखराजन एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लोखंडे व अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या सर्व साधारण सभेत कोरोना संसर्ग व ग्रामपंचायतीने करावयाच्या कामांचा आढावा घेण्यात आला, पावसाळ््यातील साथरोगांच्या स्थितीबाबतही माहिती जाणून घेण्यात आली. या व्यतिरिक्त काही रस्त्यांच्या कामांना, ग्रामपंचायतीमधील रखडलेल्या काही योजनांच्या कामांनाही या बैठकीत मान्यता घेण्यात आली. बुलडाणा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा २७ कोटी रुपायंच्या घरात असून व्हीसीद्वारे त्यास कार्याेत्तर मंजुरी घेतल्याने याची जि. प. च्या इतिहासात नोंद झाली.

 

Web Title: Buldana: VC's post-work approval of ZP's budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.