चार पाणी पुरवठा योजनांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:01 AM2017-07-29T02:01:00+5:302017-07-29T02:04:10+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील चार पाणीपुरवठा योजनांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बुलडाणा जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी दिले.

buldana water supply scheme renewed process | चार पाणी पुरवठा योजनांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करा!

चार पाणी पुरवठा योजनांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करा!

Next
ठळक मुद्देबबनराव लोणीकर यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील चार पाणीपुरवठा योजनांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बुलडाणा जिल्हा परिषदेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी दिले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व मोताळा तालुक्यातील चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे नूतनीकरणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार चैनसुख संचेती यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पाणीपुरवठा मंत्री लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दूधलगावसह २२ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मोताळा तालुक्यातील दाताळासह १५ गावात प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, मोरखेड १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मलकापूर तालुक्यातील पान्हेरासह चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि पान्हेरासह पाच गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या योजनांसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेने दुरुस्तीसाठी आणि विस्तारित अशा प्रकारे दोन स्वतंत्र प्रस्ताव पाठवावेत. या प्रस्तावांचा विशेष बाब म्हणून पाठपुरावा मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांच्याकडे करू, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.

Web Title: buldana water supply scheme renewed process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.