बुलडाणा होणार महाराष्ट्रातील पहिली ‘ऑनलाइन सिटी’

By admin | Published: October 16, 2016 02:25 AM2016-10-16T02:25:46+5:302016-10-16T02:25:46+5:30

बुलडाणा अर्बन व मेक इंडिया डिजिटल कंपनीचा उपक्रम; जिल्ह्यातील व्यवसाय होणार ऑनलाइन.

Buldana will be the first 'online city' in Maharashtra | बुलडाणा होणार महाराष्ट्रातील पहिली ‘ऑनलाइन सिटी’

बुलडाणा होणार महाराष्ट्रातील पहिली ‘ऑनलाइन सिटी’

Next

बुलडाणा, दि. १५- या तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तसेच व्यवसाय ऑनलाइन करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंंंत पोहचावा यासाठी बुलडाणा अर्बन आणि मेक इंडिया डिजिटल कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व व्यवसाय ऑनलाइन करण्यात येणार असून, यासाठी मेक इंडिया डिजिटल नावाने 'अँन्ड्रॉइड अँप' तयार करण्यात आले आहे.
'मेक इंडिया डिजिटल' या नावाने सुरू करण्यात आलेल्या अँपद्वारे जिल्ह्यातील ग्राहकांना दुकान अथवा व्यवसायिकांशी थेट संपर्क साधता येणार आहे. तसेच ग्राहकाला लागणार्‍या गोष्टींची माहिती अँपद्वारे व्यावसायिकांना पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अँपचा शुभारंभ ४ ऑक्टोबर रोजी बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते करण्यात आला. जीवनात विविध गोष्टींची आवश्यकता भासते. व्यस्त जीवनामुळे प्रत्येक गोष्टींसाठी दुकानात जाणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून बुलडाणा अर्बन आणि मेक इंडिया डिजिटल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नावीन्यपूर्ण असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व व्यवसाय ऑनलाइन करण्यात येत आहे. यासाठी मेक इंडिया डिजिटल नावाने ह्यअँन्ड्रॉइड अँपह्ण तयार केले आणि या अँपद्वारे ग्राहक जिल्ह्यातील कोणत्याही दुकान अथवा व्यावसायिकांशी थेट संपर्क साधू शकतो. तसेच ग्राहकाला लागणार्‍या गोष्टींची माहिती अँपद्वारे व्यावसायिकांना पाठवू शकतात. अनेक व्यवसाय बुलडाणा जिल्ह्यात आहेत; परंतु योग्य प्रकारे जाहिरात न झाल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंंंत पोहचू शकले नाही. ह्यमेक इंडिया डिजिटलह्ण प्रोजेक्टरद्वारे ग्राहकांना जिल्ह्यातील व्यवसायाची माहिती मिळवणे सहज सोपे होणार आहे. यापुढे ग्राहकांना कोणत्याही व्यावसायिकाचा नंबर ग्राहकाच्या मोबाइलमध्ये सेव्ह करण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व सोयी या अँपमध्येच उपलब्ध राहणार आहे. हे अँप ४१ फिचर्सचे असणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४ फिचर लॉन्च होणार आहेत. पुढील फिचर्स विविध टप्प्यात आपल्या सेवेत येणार आहेत. मेक इंडिया डिजिटल अँपमुळे प्रत्येक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाच्या विविध ऑफर्स ग्राहकापर्यंंंत पोहचवू शकतात आणि ग्राहक त्या एका ठिकाणी बसून बघू शकतील. मेक इंडिया डिजिटल अँप आणि वेबसाइटचे काम पूर्ण झाले असून अँपचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. शेतीविषयक पासून तर न्यूज रिपोर्टर, अँम्ब्युलन्स, अपत्कालीन सेवा, हॉस्पिटल, बँकिंग अशा प्रकारच्या सर्व व्यवसायांचा समावेश होणार आहे. ऑनलाइन जगता व्यवसायाची चांगल्या प्रकारे ओळख निर्माण करण्यासाठी ही एक चांगली संधी व्यवसायिकांसाठी बुलडाणा अर्बन आणि मेक इंडिया डिजिटल कंपनीने आणली आहे. मेक इंडिया डिजिटल अँपद्वारे आपला व्यवसाय ऑनलाइन करण्यासाठी बुलडाणा अर्बनतर्फे खातेदारांना विशेष सूट देण्यात येणार आहे, असे आश्‍वासन बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी दिली.

Web Title: Buldana will be the first 'online city' in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.