१४ लाखांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:07 AM2017-07-29T02:07:06+5:302017-07-29T02:13:49+5:30
बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचा-यांच्या पगार घोटाळ्यातील आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीअंती १४ लाख रुपये घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचा-यांच्या पगार घोटाळ्यातील आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीअंती १४ लाख रुपये घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर राजूरकर यास २६ जुलै रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.गणेश प्रल्हाद राठोड यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जून २०१५ पासून आॅक्टोबर २०१६ पर्यंत कर्मचाºयांचे पगार पत्रकांची तपासणी केली असता, कनिष्ठ सहायक म्हणून गजानन शंकर राजूरकर तसेच आरोग्य सेवक म्हणून पुरूषोत्तम सरदारसिंह साळोक यांनी संगनमत करून काही कर्मचाºयांच्या पगारातील रक्कम आपल्या बँक खात्यात वळती केली. आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाºयांच्या पगारातून ५ लाख ८१ हजार ३४ रुपये तसेच इतर देयकामधून ८ लाख ३ हजार २९४ रुपये असे एकूण १३ लाख ८४ हजार ३२८ रुपयांचा घोटाळा करून व्हावचरवर वैद्यकीय अधिकाºयांच्या बनावट सह्या करून सदर रक्कम दोघांनी वाटून आपल्या खात्यात अवैधरीत्या वळती केल्याचे दिसून आले. कनिष्ठ सहायक राजूरकरने आपल्या बँक खात्यात ६ लाख २ हजार ४७८ रुपये तसेच आरोग्यसेवक पुरुषोत्तम साळोक याने आपल्या बँक खात्यात ७ लाख ८१ हजार ८०५ रुपये वळती केले. अशा तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१, ४०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी १३ जुलै रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांनी आरोपी पुरुषोत्तम साळोक यास उशिरा रात्री अटक करून न्यायालयात उभे केले. यावेळी न्यायालयाने आरोपी साळोक यास १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.