बुलडाणेकरांना दरारोज पाणी मिळणार -संजय गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:36 AM2021-02-05T08:36:50+5:302021-02-05T08:36:50+5:30
बुलडाणा : शहराला मागील अनेक वर्षापासून आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. खरे तर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही एवढे ...
बुलडाणा : शहराला मागील अनेक वर्षापासून आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. खरे तर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही एवढे दिवस पाण्याची वाट पहावी लागत आहे. हे पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे होत आहे. पुढील दोन महिन्यांच्या आत नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा उपलब्ध होईल असे नियोजन सुरु आहे. तसेच २२ फेबुवारी रोजी शहरातील संगम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ५२ फुटांचा भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. त्या जागेचे भूमिपूजन करण्यात येईल, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.
ते शहरातील शिवनेरी चौक परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता पार पडला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या हायब्रीड एन्युटी कार्यक्रमाअंतर्गत चिंचोले चौक ते बसस्थानकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याची पायाभरणी आमदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. शासनाच्यावतीने दोन कोटी ११ लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, यापुढे शहरात वाॅटर पार्क, भव्य रस्ते, व्यापारसंकुल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओपन जिम, वृध्दांसाठी मनोरंजन पार्क या सह अनेक विकासाची कामे लवकरच पार पाडली जाणार आहेत. यातील बहुतांश योजना मंजूर असून काही योजना तर सुरूही आहेत. यावेळी न.प. उपाध्यक्ष विजय जायभाये, डाॅ. शोन चिंचोले, गोपालसिंग राजपूत, दामोधर बिडवे, बाळासाहेब धूड, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, दीपक सोनुने, निशिकांत ढवळे, आदी उपस्थित होते. (वा.प्र.)