Buldhana: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी कट्यासह १७ जिवंत काडतुसे केली जप्त, एकास अटक
By संदीप वानखेडे | Published: April 9, 2024 01:34 PM2024-04-09T13:34:17+5:302024-04-09T13:34:40+5:30
Buldhana News: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलीस विभाग अलर्ट माेडवर आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला ८ एप्रिल राेजी जळगाव जामाेद तालुक्यातील खेड शिवारातून अटक केली़
- संदीप वानखडे
बुलढाणा - लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलीस विभाग अलर्ट माेडवर आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला ८ एप्रिल राेजी जळगाव जामाेद तालुक्यातील खेड शिवारातून अटक केली़ त्याच्याकडून देशी कट्यासह १७ जीवंत काडतुसे आणि इतर एवज असा ७७ हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे़
जळगाव जामाेद पाेलीस स्टेशनच्या हद्दीत एक जण अग्नीशस्त्र विकणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आराेपी शेख जमीर शेख चाँद वय३१ रा. टिपू सुलतान चौक, खेड शिवापूर, जामोद जि. बुलढाणा यास अटक केली़ त्याच्याकडून देशी बनावटीचे एक अग्निशस्त्र किंमत ४० हजार, १७ जिवंत काडतुस किंमत १७ हजार, स्टीलची मॅगझिन किंमत पाच हजार, एक माेबाईल किंमत १५ हजार असा ७७ हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा महामुनी , अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात , उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने करण्यात आली़ या पथकात एपीआय आशीष चेचरे, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, हेकाॅ दिपक लेकुरवाळे, एनपीसी गणेश पाटील, पुरुषाेत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन गोरले, आशा मोरे आदींनी केली़