बुलडाणा जिल्ह्यात २८ टक्केच जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:26 AM2017-09-30T01:26:16+5:302017-09-30T01:26:31+5:30
बुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तिन मोठय़ा प्रकल्पात पावसाळ्यापूर्वी 0४.४५ टक्के जलसाठा होता. आता २३.८0 टक्के जलसाठा आहे. तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ मध्यम प्रकल्पात एका महिन्यापूर्वी १६.११ टक्के जलसाठा होता. आता ४१.८९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये एका महिन्यापूर्वी १२.0३ टक्के जलसाठा होता. आता १९.९२ टक्के असा अल्प जलसाठा आहे. दीड महिन्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात या पाणीसाठय़ाची जी स्थिती हो ती, त्यात नगण्य वाढ झाली आहे.
जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उ पयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ३७.६८ टक्के जलसाठा आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत १0.७४ टक्के जलसाठा आहे.तर खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९0.४0 दलघमी जलसाठय़ाच्या २२.९९ टक्के जलसाठा आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील तिन्ही मोठय़ा प्रकल्पात एकूण २३.८0 टक्के जलसाठा आहे. यावरून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात अल्प जलसाठा असल्याचे दिसून येते.
पलढग प्रकल्प व येळगाव धरण ओव्हरफ्लो
परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे कोरड्या पडत चाललेल्या जलसाठय़ांमध्ये वाढ होऊ लागली. २७ सप्टेंबरपयर्ंत सरासरीच्या ९२.७३ टक्के अर्थात ६६0.0८ मिमी पाऊस झाल्यानंतरही जिल्ह्यातील जलसाठय़ांमध्ये असलेला साठा चिं ताजनकच आहे. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी असे तीन मोठे प्रकल्प असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी पलढग ओव्हरफ्लो झाले आहे. तर बुलडाणा तालुक्यातील येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र इतर प्रकल्पांमध्ये जलसाठा अजूनही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.
मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठा
जिल्ह्यातील एकूण ७ मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठा आहे. त्यात पलढग प्रकल्प १00 टक्के भरला असून ज्ञानगंगा प्रकल्पात ४0.५५, मस प्रकल्पात २८.७२, कोराडी प्रकल्पात ३४.२६, मन प्रकल्पात २६.४४, तोरणा प्रकल्पात ३७.४0 व उ तावळी प्रकल्पात २४.८६ टक्के जलसाठा आहे.