Buldhana: ५८ पानटपरीधारकांवर कारवाई, १४ हजारांचा दंड, बुलढाण्यात तंबाखू नियंत्रण पथकाच्या कारवाईचे सत्र
By ब्रह्मानंद जाधव | Published: May 23, 2023 07:13 PM2023-05-23T19:13:44+5:302023-05-23T19:14:11+5:30
Buldhana: बुलढाणा जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील पानटपरी चालकांवर २३ मे पासून कारवाईचे सत्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी तंबाखू नियंत्रण पथकाने ५८ पानटपरीधारकांवर कारवाई केली आहे.
- ब्रह्मानंद जाधव
बुलढाणा : जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील पानटपरी चालकांवर २३ मे पासून कारवाईचे सत्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी तंबाखू नियंत्रण पथकाने ५८ पानटपरीधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये पानटपरी चालकांकडून १४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी एम. एम. राठोड, पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वासेकर, ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अंमलबजावणी पथकाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कारवाईचे सत्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी बुलढाणा शहरातील ५८ पानटपरीधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये पानटपरी चालकांकडून १४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक सरकटे, सामाजिक कार्यकर्ता आराख, अन्न औषध प्रशासन विभाग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे जुमडे, बोचे, खेरडे यांनी ही कारवाई केली आहे.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
प्रशासकीय पातळीवरून आता तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.