Buldhana: दोन महिन्यांपूर्वी पळून गेलेले युगुल पोलिसांच्या ताब्यात, युवकावर अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
By सदानंद सिरसाट | Published: May 19, 2024 08:11 PM2024-05-19T20:11:44+5:302024-05-19T20:14:13+5:30
Buldhana News: सव्वा दोन महिन्यांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षे ६ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पाेलिसांनी तपासादरम्यान १७ मे रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातून आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.
- सदानंद सिरसाट
संग्रामपूर (बुलढाणा) - सव्वा दोन महिन्यांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षे ६ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. पाेलिसांनी तपासादरम्यान १७ मे रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातून आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. मुलीचे बयान नोंदवून आरोविरुद्ध अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली.
याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून ८ मार्च रोजी तामगाव पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल होता. त्यावर तामगाव ठाण्यातील तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, हेकाॅ अनिल सुशीर, महिला पोकॉ सपना पवार यांनी तपास केला. त्यामध्ये १७ मे रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातून आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे बयान नोंदवले. तपासाअंती विविध कलमान्वये गुन्ह्यामध्ये वाढ केली.
७ मार्च रोजी घडली होती घटना
७ मार्च रोजी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शौचास जात असल्याचे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मुलीची शोधाशोध सुरू असतानाच तालुक्यातील दुसऱ्या गावातील कुंभारखेड येथील युवकाच्या दुचाकीवर बसून गेल्याची माहिती मिळाली. ८ मार्च रोजी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यानुसार तामगाव पोलिस ठाण्यात कुंभारखेड येथील २३ वर्षीय आरोपीवर कलम ३६३ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. १७ मे रोजी त्यामध्ये वाढीव कलम ३६६ (अ), ३७६, ३७६ (२), (एन) भादवी सहकलम ४ (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती तामगाव पोलिसांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक जीवन सोनवणे करीत आहेत.