Buldhana: करमोडा येथील शेतकर्याची विषप्राशन करुन आत्महत्या
By विवेक चांदुरकर | Updated: March 23, 2024 20:11 IST2024-03-23T20:10:48+5:302024-03-23T20:11:25+5:30
Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील ४८ वर्षीय शेतकर्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली.

Buldhana: करमोडा येथील शेतकर्याची विषप्राशन करुन आत्महत्या
- विवेक चांदूरकर
वरवट बकाल - संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील ४८ वर्षीय शेतकर्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली.
संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील डिगांबर रघुनाथ जळमकार (वय ४८ वर्षे) यांच्याजवळ लोहगाव शिवारात १.४६ हेक्टर शेती आहे. दरवर्षी नापिकीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्टेट बँकेचे कर्ज, मुलीचे लग्न ह्या काळजीने कंटाळून त्यांनी २० मार्च रोजी विषप्राशन केले. त्यांना प्रथम वरवट बकाल येथे शासकीय रुग्णालयात नेले असता डाक्टरांनी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात पाठविले. उपचारा दरम्यान डिगांबर जळमकार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, १ मुलगा असा आप्त परिवार आहे. शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेंतर्गत कुटुंबास आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी होत आहे.