Buldhana: घाटपुरी येथील युवकाची नांदुऱ्यात हत्या,मोताळा रोडवरील पेट्रोलपंपानजीक सापडला होता मृतदेह

By अनिल गवई | Published: March 6, 2024 06:28 PM2024-03-06T18:28:25+5:302024-03-06T18:28:51+5:30

Buldhana News: नांदुरा शहरापासून नजीकच असलेल्या मोताळा रोडवरील एका पेट्रोलपंपानजीक २ मार्च रोजी मृताअवस्थेत आढळून आणि हत्या झालेल्या मृतक युवकाची अचेी ओळख पटली आहे.

Buldhana: A youth from Ghatpuri was killed in Nandura, the body was found near a petrol pump on Motala road. | Buldhana: घाटपुरी येथील युवकाची नांदुऱ्यात हत्या,मोताळा रोडवरील पेट्रोलपंपानजीक सापडला होता मृतदेह

Buldhana: घाटपुरी येथील युवकाची नांदुऱ्यात हत्या,मोताळा रोडवरील पेट्रोलपंपानजीक सापडला होता मृतदेह

- अनिल गवई 
खामगाव - नांदुरा शहरापासून नजीकच असलेल्या मोताळा रोडवरील एका पेट्रोलपंपानजीक २ मार्च रोजी मृताअवस्थेत आढळून आणि हत्या झालेल्या मृतक युवकाची अचेी ओळख पटली आहे. तो घाटपुरी येथील हर्षल उर्फ पप्पू सदाशिव घोपे असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, मोताळा रोडवरील माउली पेट्रोलपंपाजवळील लोणवाडी शेतशिवारातील शेताच्या धुर्यावर एक युवक मृतावस्थेत दोन मार्च रोजी आढळून आला. मृतकाचा चेहरा विद्रुप तसेच त्याच्या डोक्यावर मारल्याचे व्रण आढळले होते. गळा आवळून खून झाल्याचेही प्रथमदर्शनी समोर आले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, नांदुरा पोलीसांची पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. अज्ञात आरोपी िवरोधात गुन्हा दाखल केला. युवकाचे छायाचित्र प्रसिध्दी तसेच समाज माध्यमात प्रसिध्द केले. माहिती समजल्यानंतर मृतकाचा भाऊ अभिषेक घोपे याने सोमवार ४ मार्च रोजी रात्री नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये मृतक युवक हा आपला भाऊ असल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यावरून पोलिसांनी  हर्षल उर्फ पप्पू सदाशिव घोपे याचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.  युवकाच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी नांदुरा पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

Web Title: Buldhana: A youth from Ghatpuri was killed in Nandura, the body was found near a petrol pump on Motala road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.