Buldhana: मावस बहिणीवरच अत्याचार; आराेपीस दहा वर्ष सश्रम कारावास, जिल्हा व सत्र न्यायाधिशांचा निर्णय
By संदीप वानखेडे | Published: May 30, 2024 09:08 PM2024-05-30T21:08:52+5:302024-05-30T21:09:17+5:30
Buldhana Crime News: लग्नाचे आमीष दाखवून मावस बहीणीस पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या आराेपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठाेठावला़ रंजीत किसन पारवे असे आराेपीचे नाव आहे.
- संदीप वानखडे
बुलढाणा - लग्नाचे आमीष दाखवून मावस बहीणीस पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या आराेपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठाेठावला़ रंजीत किसन पारवे असे आराेपीचे नाव आहे़
शेळगाव आटाेळ येथील एका १६ वर्षीय मुलीस आराेपी रंजीत किसन पारवे याने लग्नाचे आमीष दाखवनू पळवून नेले हाेेते़ या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मावसभाऊ असलेल्या रंजीत पारवे विरुद्ध अंढेरा पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता़ या प्रकरणाचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे यांनी करून दाेषाराेपपत्र बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दाखल केले हाेते़ विशेष सरकारी वकील ॲड. संताेष खत्री यांनी या प्रकरणी सरकारी पक्षाची बाजु मांडली़ सरकारी पक्षाकडून १० साक्षीदार तपासण्यात आले़ पिडीत मुलगी आणि तिची आई फितूर झाली हाेती़ तरीही त्यांच्या उलट तपासात आराेपीविरुद्ध गुन्हा सिद्धा हाईल इतपत पुरावा मिळाला़
त्यामुळे, जिल्हा व सत्र न्यायायाधीश आर. एन. मेहरे यांनी आराेपी रंजीत किसन पारवे यास दहा वर्षांचा सश्रम करावासाची शिक्षा सुनावली़ यामध्ये कलम ३६३ नुसार तीन वर्ष शिक्षा व एक हजार दंड. दंड न भरल्यास दाेन महिन्याची साधी शिक्षा़ तसेच कलम ३६६ नुसार पाच वर्षांची कठाेर शिक्षण आणि दाेन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी शिक्षा, पाेक्साे कायद्याच्या कलम ६ नुसार १० वर्षांची कठाेर शिक्षा व दाेन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी शिक्षा तसेच कलम ३७६(२)(जे)(एन) नुसार सुद्धा शिक्षा सुनावली़ पाेक्साे कायद्याच्या कलम १० नुसार सुद्धा आराेपीस शिक्षा ठाठेावली़ परंतु, पाेक्साे कलम ६ नुसार शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र शिक्षणा देण्यात आली नाही़ या प्रकरणी सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड़ संताेष खत्री यांनी कामकाज पाहीले़ तसेच त्यांना काेर्ट पैरवी हेकाॅ सुरेश माेरे पाेलीस स्टेशन अंढेरा यांनी सहकार्य केले़