बुलडाण्यात युती-आघाडीत दुरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:47 AM2019-04-17T04:47:48+5:302019-04-17T04:48:09+5:30
बुलडाणा लोकसभा मतदार संघात युती आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे.
बुलडाणा लोकसभा मतदार संघात युती आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे. निवडणूक रिंगणात १२ उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि राष्टÑवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात होत आहे, हे दोन्ही नेते जिल्ह्यासाठी हेवीवेट आहेत.
>विकास आणि देशाच्या सुरक्षेवर भर
दहा वर्षांत केलेला विकास, खामगाव जालना रेल्वेचा प्रलंबित प्रश्न, जिल्ह्याचा रस्ते विकास, सिंचन सुविधा हे मुद्दे घेऊन जाधव यांनी प्रचार केला. राष्टÑवादी, मोदींचे सक्षम नेतृत्व यावर त्यांनी भर दिला. यासोबतच तीर्थक्षेत्र विकास, समृद्धी महामार्गाची सुरू असलेली कामे, १५ राष्ट्रीय महामार्गच्या कामांना मंजुरी या मुद्द्यांसह प्रतिस्पर्धी उमेदवाराची निष्क्रियता हे मुद्दे त्यांनी प्रचारात मांडले.
> रखडलेला विकास व खासदाराचे दुर्लक्ष
दहा वर्षांपासून खासदार असलेल्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांची निष्क्रियता, रखडलेली विकास कामे, कमिशनखोरी व टक्केवारीचा आरोप, भाजपा सरकारचे अपयश, शेतकऱ्यांची दैनावस्था यावर त्यांनी भर दिला. विकासामध्ये रखडलेल्या बुलडाणा जिल्ह्याला प्रगतीच्या ट्रॅकवर नेण्यास प्राधान्य आणि शिक्षित व अनुभवी उमेदवार अशा स्वरूपात मतदारांना साद घातली.
हेही उमेदवार आहेत रिंगणात
१७व्या लोकसभेसाठी बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १२ उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार, बसपाचे अब्दुल हफीज, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रताप पाटील आणि अपक्ष म्हणून अनंता पुरी, गजानन उत्तम शांताबाई, दिनकर सांबारे, प्रविण मोरे, वामनराव आखरे, भाई विकास प्रकाश नांदवे, विजय बनवारीलालजी मसानी हे सात जण निवडणूक रिंगणात उभे आहेत