Buldhana: पोलिस स्टेशनमधून परत जाताना वृद्धेला मारहाण, मोबाइल हिसकावून नेला, एकाच कुटुंबातील तिघांविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Published: July 5, 2024 07:17 PM2024-07-05T19:17:57+5:302024-07-05T19:18:25+5:30
Buldhana Crime News: येथील ग्रामीण पोलिस स्टेशनमधून परत जात असताना तिघांनी संगनमत करून वृद्धेला शिवीगाळ करीत मारहाण केली. धारधार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना स्थानिक बसस्थानकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
- अनिल गवई
खामगाव - येथील ग्रामीण पोलिस स्टेशनमधून परत जात असताना तिघांनी संगनमत करून वृद्धेला शिवीगाळ करीत मारहाण केली. धारधार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना स्थानिक बसस्थानकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, अन्नपूर्णा प्रल्हाद म्हारनोर ६१ ही वृद्ध महिला तिच्या सुनेसोबत ग्रामीण पोलिस स्टेशनमधून घरी शेलोडी येथे परत जात होती. दरम्यान, गणेश किसन पुणेकर (५५), नाना गणेश पुणेकर (२७), मंजुळा गणेश पुणेकर (४५) यांनी संगनमत करून तक्रारदार महिलेस शिवीगाळ केली. चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत, गणेश पुणेकर याने मोबाइल हिसकावून नेला. यावेळी झालेल्या झटापटीत तक्रारदार महिलेचे मंगळसूत्र कुठेतरी पडल्याचे म्हटले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११९ (१), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सफौ. दीपक ईलामे करीत आहेत.