बुलडाणा : माळवंडी दरोडा तपासासाठी चौथ्या पथकाची नियुक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:41 IST2018-03-31T00:41:36+5:302018-03-31T00:41:36+5:30
बुलडाणा : तालुक्यातील माळवंडी येथील दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये रायपूर पोलीस गोपनियता बाळगत असून, आरोपींच्या शोधासाठी चौथ्या पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे.

बुलडाणा : माळवंडी दरोडा तपासासाठी चौथ्या पथकाची नियुक्ती!
बुलडाणा न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील माळवंडी येथील दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये रायपूर पोलीस गोपनियता बाळगत असून, आरोपींच्या शोधासाठी चौथ्या पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे.
माळवंडी येथे २५ मार्च रोजी सोने व्यापाºयाच्या निवासस्थानी सात ते आठ दरोडेखांनी दरोडा टाकून ११ लाख रुपयांचे सोने व नगदी ३५ हजार रुपये लंपास केले होते. प्रकरणाच्या तपासासाठी रायपूर पोलिसांची दोन व एक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त करण्यात आले होते. सैलानी येथील झोपड्यांचीही पोलिसांनी तपासणी केली होती.
मात्र पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. आता आरोपींच्या शोधासाठी गुन्ह्याची मोडस आॅपरेंटसीचा आधार घेत तपास सुरू असून, चौथ्या पथकाचीही तपासासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रायपूरचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एन. सय्यद यांनी लोकमतशी बोलताना दिली. पोलीस या प्रकरणाच्या तपासामध्ये गोपनियता पाळत असून, या प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. प्रकरणाच्या तपासाचा तपशील देण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.
तपासणी ठरली निष्फळ!
२६ मार्च रोजी दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले होते. त्याने सैलानीकडे मार्ग दाखवला होता. त्यामुळे दरोडेखोरांच्या शोधात पोलिसांची दोन पथके सैलानी येथील झोपड्यांची तपासणी करीत होती. प्रदीर्घ काळ या झोपड्यांची तपासणी केल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.