Buldhana: बैलगाडीत सापडला बेपत्ता युवकाचा मृतदेह, लाेखंडा येथे खळबळ
By अनिल गवई | Updated: May 8, 2024 16:37 IST2024-05-08T16:37:23+5:302024-05-08T16:37:47+5:30
Buldhana News: एक २९ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळून आला. खामगाव तालुक्यातील लोखंडा येथे ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. योगेश अशोक लोखंडकार असे मृतकाचे नाव आहे.

Buldhana: बैलगाडीत सापडला बेपत्ता युवकाचा मृतदेह, लाेखंडा येथे खळबळ
- अनिल गवई
खामगाव - एक २९ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळून आला. खामगाव तालुक्यातील लोखंडा येथे ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. योगेश अशोक लोखंडकार असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, लोखंडा येथील योगेश लोखंडकार हा मंगळवारी सायंकाळपासून घरी नव्हता. दरम्यान, बुधवारी सकाळी गजानन शालीग्राम वानखडे यांच्या शेतातील टिनशेडमध्ये उभ्या असलेल्या बैलगाडीवर मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे लोखंडा गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनिल पांडुरंग लोखंडकार यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी युवकाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल चव्हाण करीत आहेत. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत असून, या दुर्देवी घटनेमुळे युवकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.