बस अपघातातील मृतांची ओळख पटली; हिंगोलीतील बसमालक, चालकासह सहा जणांचा समावेश
By सदानंद सिरसाट | Published: July 29, 2023 11:10 AM2023-07-29T11:10:32+5:302023-07-29T11:10:55+5:30
अमरनाथवरून हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरी बसला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या लक्झरी बसने समोरून धडक दिल्याने ती बस चिरत गेली
खामगाव - मलकापूर (बुलढाणा) : दोन लक्झरी बसेसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आतापर्यंत मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे. त्यामध्ये बसमालक, चालकासह सहाही जण हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालय, मलकापुरातील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलकापूर नजिकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर चक्का जाम झाला होता.
अमरनाथवरून हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरी बसला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या लक्झरी बसने समोरून धडक दिल्याने ती बस चिरत गेली. या भीषण अपघातात आधी ५ त्यानंतर उपचारादरम्यान एक असे सहा जण ठार झाले. तर २४ जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी अत्यवस्थ ५ जणांना बुलढाणा हलविण्यात आले. आहे.
मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथील बालाजी तीर्थ यात्रा कंपनी टूर अँण्ड ट्रँव्हल्सचे मालक शिवाजी धनाजी जगताप, चालक संतोष आनंदराव जगताप, दोघेही रा. भांडेगाव, आचारी अर्चना गोपाल घुकसे, सचिन शिवाजी महाडे, दोघेही रा. लोहगाव, तर प्रवाशी राधाबाई सखाराम गाढे, रा. जयपूर ता. हिंगोली, कानोपात्रा गणेश टेकाळे, रा. सिंधीनाका हिंगोली यांचा समावेश आहे.
जखमी प्रवाशांची नावे
विक्रांत अशोकराव समरित (२८), अमरावती, गणेश शिवाजी जगताप, (३८), भांडेगाव, संतोष भिकाजी जगताप (४३), हिंगोली, बद्रीनाथ संभाजी कराळे (५२), बबिता एकनाथ कराळे (५२), गिरीजाबाई बद्रीनाथ कराळे (५०), रा. दिग्रज, जि. हिंगोली, गंगाराम दत्तात्रय गिते, (६३), सिंधीनाका, हिंगोली, महादेव संबा रणवले (४०), खंडाळा, भागवत पुंजाजी फालके (२६), जयपूर वाडी, पार्वताबाई डोखले (३५), सिंधीनाका, किसन नामाजी पसारे (६०), भगवान नारायण गिते (४८), सिंधी नाका, द्वारकाबाई गजानन ढोकले (३०), हनुमान संभाजी फालके (२६) जयपूर वाडी, राधानाथा रामभाऊ घुकसे (३२), हिंगोली, मोनिका विष्णू घुले (३०) रा. लोहगाव, लिलाबाई एकनाथ आसोले (४८), गणेश शिवाजी जगताप (३८), संगिता शैलेंद्र पोतदार (५२), नागपूर, तर किरकोळ जखमींमध्ये उज्वला संजय नगराळे (५१), हर्षदा संजय नगराळे (३१), संजय किसन नगराळे (६०) सर्व रा. नागपूर, मारोती पूंजाजी जाधव (६८) चिखला, प्रगती दीपक किशोर (२३), नवनगर धुळे, काशिराम महाजी गिते (६०), सिंधीनाका हिंगोली, लक्ष्मीकांत सुभाष अथिलकर, अचलपूर.