बुलडाणा जिल्ह्यातून वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता, ३३५ जणांना शोधण्यास पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:27 PM2018-01-11T17:27:13+5:302018-01-11T17:29:44+5:30
खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
- भगवान वानखेडे
खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यापैकी ३३५ व्यक्ती मिळाल्याची सकारात्मक बाब जरी समोर येत असली तरी मात्र डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.
घरी कुणालाच काही न सांगता शौचास जातो म्हणुन निघून जाणे, शेतात गेला आणि पुन्हा परतलाच नाही, मित्रांक डे, नातेवार्इंकाडे गेला होता पण आढळून आला नाही अशा अनेक तक्रारी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक पोलिस स्टेशनला तक्रारी देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही संख्या जिल्ह्यातील सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात तब्बल ९० व्यक्ती बेपत्ता
मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एकाच महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता होणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावणारे आहे. वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता जरी झाल्या असल्या तरी ३३५ व्यक्ती शोधण्यात पोलिसांना यश आहे. यापेक्षाही अधिक व्यक्ती घरी परतलेल्या असतात परंतु हरवल्याची तक्रार दिली जाते परंतु घरी परत आल्याची माहिती दिली जात नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आॅपरेशन मुस्कान लाभदायी
पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला आॅपरेशन मुस्कान राबवण्यात येत आहे. यासाठी एक विशेष पथक ही तयार करण्यात आले आहे. या पथकाला बेपत्ता व्यक्ती शोधण्यात येत असून आगामी काळात हे आॅपरेशन आणखीन गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कुटूंबातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पटकन दिली जाते, परंतु त्या तुलनेत मात्र आढळून आल्याची माहिती पोलिस स्टेशनला दिली जात आहे. मात्र नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रारीबरोबरच आढळून आल्याची माहितीही द्यावी.
-संदिप डोईफोडे, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.