पीककर्ज वाटपासाठी  बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दत्तक घेतले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 07:08 PM2018-06-20T19:08:57+5:302018-06-20T19:08:57+5:30

बुलडाणा : आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का अद्यापही दोन अंकी संख्येत न पोहोचल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनीच खुद्द बुलडाणा तालुक्यातील पांग्री उबरहंडे गाव पीककर्ज वाटपासाठी दत्तक घेतले आहे.

Buldhana district collector has adopted village |  पीककर्ज वाटपासाठी  बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दत्तक घेतले गाव

 पीककर्ज वाटपासाठी  बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दत्तक घेतले गाव

Next
ठळक मुद्देपीककर्ज वाटपाला गती मिळण्यासाठी हा एक प्रकारे पायलट प्रोजेक्ट म्हणून बघितल्या जात आहे. जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाला गती मिळावी या दृष्टीकोणातून पथदर्शी उपक्रम म्हणून या गावाची त्यांनी निवड केली आहे.सोबतच पीककर्ज मिळण्यासाठी प्रकरण निहाय बँकाकडे पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसेवताची नियुक्ती केली आहे.

नीलेश जोशी 

बुलडाणा : आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का अद्यापही दोन अंकी संख्येत न पोहोचल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनीच खुद्द बुलडाणा तालुक्यातील पांग्री उबरहंडे गाव पीककर्ज वाटपासाठी दत्तक घेतले आहे. पीककर्ज वाटपाला गती मिळण्यासाठी हा एक प्रकारे पायलट प्रोजेक्ट म्हणून बघितल्या जात आहे. दरम्यान, तालुकास्तरावरील अधिकार्यांनीही प्रत्येकी पाच गावे दत्तक घेऊन पीककर्ज वाटपाचा टक्का सुधरविण्यास प्राधान्य द्यावे तथा पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे यंत्रणेला सुचीत केले आहे. दरम्यान, पीककर्ज वाटपासाठी एखादे गाव दत्तक घेण्याची ही राज्यातील कदाचीत पहिलीच घटना असावी. बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख २८ हजार ६६५ शेतकर्यांना एक हजार ७४५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ठ आहे. पण प्रत्यक्षात २० जूनपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ४४८ शेतकर्यांना १२२ कोटी रुपायंचे पीककर्ज वाटप झाले आहे. आणि हा टक्का अवघा सात टक्के आहे. त्या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय बँकांनी पीककर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे, हा मुद्दा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी थेट बुलडाणा तालुक्यातील पांग्री उबरहंडे गावच दत्तक घेतले. बुधवारी दुपारी त्यांनी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रभाकर श्रोते आणि जिल्हा बँकेचे अरुण चव्हाण , एसडीओ सुरेश बगळे यांच्यासह पांग्री उबरहंडे गाव गाठले. गावातील मंदिरालगतच जमलेल्या गर्दीला त्यांनी पीककर्ज मिळाले का? अशी विचारणा केली असता अनपेक्षीत गावात आलेल्या जिल्हाधिकारी नेमक्या कोणत्या कामासाठी गावात आल्या याची कल्पना आली. दरम्यान, पांग्री उबरहंडे येथील पीककर्ज वाटपातील अडथळे, अडचणी व तक्रारी स्वत: आपण सोडविणार असल्याचे स्पष्ट करीत हे गावच त्यासाठी आपण दत्तक घेतल्याचे त्या म्हणाल्या. गावातील एकही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी बँक अधिकारी तथा संपूर्ण यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देशच त्यांनी दिले. जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाला गती मिळावी या दृष्टीकोणातून पथदर्शी उपक्रम म्हणून या गावाची त्यांनी निवड केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय उबरहंडे यांनी केले. यावेळी गावच्या सरपंच सरला गवई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सेवा क्षेत्राची अडचण न ठेवता पीककर्ज पांग्री येथील कार्यक्रमात बोलताना बँकांनी सेवा क्षेत्रची मर्यादा न ठेवता गावातील प्रत्येक शेतकर्याला पीककर्ज वाटप करावे, असे स्पष्ट करीत पात्र शेतर्यांना पीककर्ज घेताना अडचण जाणार नाही, याची दक्षता बँकांनी घ्यावी. सोबतच पीककर्ज मिळण्यासाठी प्रकरण निहाय बँकाकडे पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसेवताची नियुक्ती केली आहे. याच प्रमाणे प्रत्येक गावात ग्रामसेवक पीककर्ज प्रकरणनिहाय बँकाकडे पाठपुरावा करेल, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. उपक्रमाचा हा आहे उद्देश कर्जमाफी मिळालेल्या, नियमित पीककर्ज फेडणार्या आणि नवीन पात्र शेतकर्यांना कुठल्याही अडचणीशिवाय पीककर्ज मिळावे, हा प्रमुख उद्देश या गाव दत्तक घेण्याच्या उपक्रमा मागे असल्याचे या कार्यक्रमावरून स्पष्ट होते. सोबतच यावेळी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी कर्जमाफी मिळालेल्यांची यादीही गावात प्रसिद्ध केली. पात्र शेतकर्याला पीककर्ज मिळण्यासंदर्भात स्थानिक पातळीवरच निर्णय घेता यावा, या दृष्टीकोणातून हा उपक्रम उपयुक्त असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Buldhana district collector has adopted village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.