बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड

By सदानंद सिरसाट | Published: October 15, 2023 06:21 PM2023-10-15T18:21:20+5:302023-10-15T18:21:29+5:30

जिल्हाधिकारी पाटील यांनी रविवारी खामगाव तालुक्यात विविध कामांचा आढावा घेतला.

Buldhana District Collector removed ayushyaman card | बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड

बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड

खामगाव (बुलढाणा) : महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य याेजना कार्ड काढण्याची जिल्ह्यातील गती पाहता जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी स्वत: त्यामध्ये पुढाकार घेत ते कार्ड माेबाइलद्वारे कसे काढावे, याचे प्रात्यक्षिकच खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथे ग्रामस्थांना दिले. या गावात प्रशासकीय भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावातील लाभार्थ्यांचे १४० कार्ड काढण्यात आले.

जिल्हाधिकारी पाटील यांनी रविवारी खामगाव तालुक्यात विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी चंदनसिंह राजपूत उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी स्वतः मोबाइलवर प्रात्यक्षिक करून सर्वांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे आभा कार्ड कसे काढावे, याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा ताई, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

Web Title: Buldhana District Collector removed ayushyaman card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.