बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 06:13 PM2019-04-01T18:13:12+5:302019-04-01T18:13:21+5:30

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली.  जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे.

In Buldhana district, double the application for the 'RTE' | बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट!

बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट!

googlenewsNext

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली.  जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, लवकर पहिली सोडत होणार आहे. 
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेश प्रक्रियेला ८ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. राज्यात सन २०१९-२० साठी आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत शाळांच्या नोंदणीसाठी ८ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ५ मार्चपासून पालकांसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याला सुरूवात झाली होती. दरम्यान, ३० मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज भरण्यात आले. जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून जिल्हाभरातून ५ हजार ४१० अर्ज आले आहेत. आता विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित सोडत पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. दरम्यान, सोडत पद्धतीची ही प्रक्रिया लवकरच जाहीर होईल. त्यामुळे अर्ज केलेल्या पालकांना आता पुन्हा सोडत साडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पालकांना आपल्या पाल्याचा शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी आरटीईचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी अनेक पालकांची आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेवर मदार दिसून आली. परिणाम स्वरूप  अडचणीच्या काळातही आरटीईच्या आॅनलाइन प्रवेश अर्जाची संख्या साडेपाच हजारावर गेली. 
 
संकेतस्थळही होते ‘स्लो’

यावर्षी सुरूवातीपासून आरटीईचे संकेतस्थळ स्लो चालत असल्याची ओरड पालकांमधून होत होती. दरम्यान, मध्यंतरी अर्ज प्रक्रियेची मुदतही वाढवून देण्यात आली होती. परंतू संकेतस्थळाच्या अडचणी कायमच होत्या. आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने अनेक पालक सध्या अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर आहेत.

Web Title: In Buldhana district, double the application for the 'RTE'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.