बुलडाणा जिल्हा : दोन वेगवेगळय़ा अपघातात बीएसएफच्या जवानांसह आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:33 PM2017-12-24T22:33:32+5:302017-12-24T22:42:54+5:30

सावत्रा/नांदुरा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातामध्ये बीएसएफच्या तीन  जवानांसह आठ जण जखमी झाले. पहिला अपघात हा जानेफळ नजीक घडला. त्यात जालना जिल्हयातील कारमधील पाच जण जखमी झाले. तर दुसरा अपघात नांदुरा शहरानजीक कोलासर फाट्याजवळ घडला. यामध्ये ट्रकने बीएसएफच्या गाडीला धडक दिल्याने त्यातील तीन जवान जखमी झाले.

Buldhana district: Eight people including two BSF jawans were injured in two separate accidents | बुलडाणा जिल्हा : दोन वेगवेगळय़ा अपघातात बीएसएफच्या जवानांसह आठ जण जखमी

बुलडाणा जिल्हा : दोन वेगवेगळय़ा अपघातात बीएसएफच्या जवानांसह आठ जण जखमी

Next
ठळक मुद्देभरधाव कार झाडावर आदळी जालना जिल्ह्यातील पाच जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
सावत्रा/नांदुरा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातात बीएसएफच्या तीन  जवानांसह आठ जण जखमी झाले. पहिला अपघात हा जानेफळ नजीक घडला. त्यात जालना जिल्हयातील कारमधील पाच जण जखमी झाले. तर दुसरा अपघात नांदुरा शहरानजीक कोलासर फाट्याजवळ घडला. यामध्ये ट्रकने बीएसएफच्या गाडीला धडक दिल्याने त्यातील तीन जवान जखमी झाले.
जानेफळ नजीकच्या घटनेत शेगाव येथे दर्शनासाठी जाणार्‍या कारला (एमएच-२१-एएक्स-२९४८) अपघात होऊन जालना जिल्ह्यातील मंठा येथील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी नऊ वाजता झाला. त्यात सोपान विठ्ठल राठोड, सुशील विठ्ठल राठोड, कमल विठ्ठल राठोड, शीतल सोपान राठोड आणि कार चालक मिथुन पांडुरंग चव्हाण (सर्व रा. मंठा) हे जखमी झाले आहेत. 
मंठा येथून शेगाव येथे ते दर्शनासाठी जात होते. दरम्यान, जानेफळ नजीक तीन किमी अंतरावर मोसंबेवाडीच्या कॅनॉलवरील पुलावरील खड्ड्यातून गाडी कुदल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या डाव्या वाजूला सुमारे ६० मीटर फरफटत जावून शेतातील धुर्यालगत असलेल्या लिंबाच्या  झाडावर आदळी. खामगावच्या दिशेने असलेले कारचे तोंड त्यामुळे चक्क मेहकरकडे झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या अपघातामध्ये उपरोक्त जखमींना गंभीर इजा झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झालेले आहे.
अपघाताला खड्डा कारणीभूत
मोसंबेवाडीनजीकच्या कॅनॉल पुलावर न दिसणारा सपाट खड्डा तयार झाला आहे. वाहन मेहकरकडून भरधाव आल्यानंतर या खड्ड्यामुळे उंच उडते आणि नियंत्रण सुटून असे अपघात होत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. गेल्या आठ दिवसामध्येया ठिकाणी डोणगाव येथील एक कार, एक विटांचा ट्रक यांना अपघात झालेले आहेत.

नांदुरा : ट्रकची बीएसएफच्या वाहनाला धडक
येथून जवळच असलेल्या कोलासर फाट्याजवळ मागून येणाºया ट्रकने बीएसएफच्या गाडीला धडक दिल्याने त्यातील तीन जवान जखमी झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदुरा कडून मलकापूरकडे जात असताना कोलासर फाट्याजवळ काही काळ ट्राफीक जाम झाली होती. त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या असताना तिथे बीएसएफची गाडी क्र. पीपी ०८ बीए ९३४४ ही उभी असताना मलकापूरकडून येणारा ट्रक क्र. एचआर ४६ डी ९६६० च्या चालकाने आपली गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरच्या बीएसएफच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे गाडीमध्ये बसलेले बीएसएफ जवान जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर ते इंदोरकडे रवाना झाले. याबाबत बीएसएफ जवान शंकरआप्पा मोहनचा मट रा.चाकुर जि.लातुर यांच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Buldhana district: Eight people including two BSF jawans were injured in two separate accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.