बुलडाणा जिल्ह्यात संततधार : सरासरी 19.1 मि.मी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 08:07 PM2017-09-21T20:07:19+5:302017-09-21T20:08:41+5:30
बुलडाणा - जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रीय झाला असून सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे. या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 63 मि.मी पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जास्त पाऊस संग्रामपूर :63 मि.ली (484 मि.ली), चिखली : निरंक (653), मेहकर: 3 (694), दे.राजा: 11 (697), लोणार: 4 (592), खामगांव : 15 (580.3), शेगांव : 20 (458), मलकापूर : 22 (649), मोताळा : 19 (607), नांदुरा: 23 (624.5), जळगांव जामोद : 20 (702), सि.राजा: 24 (682.1), बुलडाणा : 24 (926) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 248 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 19.1 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 642.2 मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार पुढीलप्रमाणे..
नळगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 34.55 टक्के, पेनटाकळी - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 17.10 टक्के, खडकपूर्णा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 5.05, पलढग - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 89.61 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 38.25 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 26.99, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12 टक्के, आजचा पाणीसाठा: 33.13 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 23.35 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 28.39 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 24.86 टक्के.