बुलडाणा जिल्हय़ात टंचाईत विहीर अधिग्रहणावर भिस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:43 AM2018-02-03T01:43:59+5:302018-02-03T01:46:17+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या असून, ६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. विहीर अधिग्रहणावर ३ कोटी २७ लाख ६0 हजार रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ५ कोटी ८८ लाख रुपयांचा आराखडा निर्माण करण्यात आला आहे. 

Buldhana district suffers on scarcity acquisition! | बुलडाणा जिल्हय़ात टंचाईत विहीर अधिग्रहणावर भिस्त!

बुलडाणा जिल्हय़ात टंचाईत विहीर अधिग्रहणावर भिस्त!

Next
ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेतविहिरींसाठी ३ तर टँकरसाठी ५ कोटी ८८ लाखांचा आराखडा 

ब्रह्मनंद जाधव। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या असून, ६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. विहीर अधिग्रहणावर ३ कोटी २७ लाख ६0 हजार रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ५ कोटी ८८ लाख रुपयांचा आराखडा निर्माण करण्यात आला आहे. 
हिवाळ्यापासूनच जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईचे चटके जाणवतात. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्याच्या दृष्टीने जानेवारीमध्ये प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या दुष्काळी काळात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा आधार घेतला जात असून, दरवर्षी प्रत्येक तालुक्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांच्या पाण्याची पातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. काही गावांमध्ये यंदा शेतीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचीही परिस्थिती अतिशय बिकट होत आहे.  पाणीटंचाईची समस्या डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाकडून विहीर अधिग्रहणावर भर देण्यात आला आहे. यावर्षी ६५३ गावांमध्ये ७१९ खासगी विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे, तसेच आतापर्यंत ४४ गावांमध्ये ५८ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या असून, त्यावर ५१ लाख २९ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे, तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकर प्रस्तावित आहे. त्यापैकी धोत्रा नंदई व मेरा बु.असे दोन टँकर सुरू आहेत. दोन गावात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरू असून, त्यासाठी १९ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. यावर्षी ४६ गावांसाठी ७0 लाख ६६ हजार रुपये खर्च झाला. 

Web Title: Buldhana district suffers on scarcity acquisition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.