हगणदरीमुक्तीमध्ये बुलडाणा जिल्हा विभागात तिसरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:36 AM2018-02-03T01:36:52+5:302018-02-03T01:42:09+5:30
बुलडाणा : फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यास जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मिशन ९0 डेजचे सकारात्मक परिणाम समोर येत असून, अमरावती विभागात जिल्हा या मोहिमेमध्ये सध्या तिसर्या क्रमांकावर आहे.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यास जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मिशन ९0 डेजचे सकारात्मक परिणाम समोर येत असून, अमरावती विभागात जिल्हा या मोहिमेमध्ये सध्या तिसर्या क्रमांकावर आहे. दरम्यान, जिल्ह्याची वाटचाल ही राज्यातील १९ हगणदरीमुक्त जिल्हा होण्याच्या दृष्टीने सुरू झाली आहे.
बुलडाणा जिल्हा फेब्रुवारी अखेर हगणदरीमुक्तीच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन केले असून, त्यानुसार युद्ध पातळीवर काम सुरू आहे. बेसलाइन सर्वेक्षण २0१२ नुसार जिल्ह्यात २ लाख २५ हजार ५१ शौचालय बांधकाम बाकी होते. त्यापैकी आजपयर्ंत १ लाख ९१ हजार ३५ शौचालय बांधकाम पूर्ण झालेले आहे. ऑनलाइननुसार जिल्ह्यात ९१.७३ टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झालेले आहे. चालू वर्षी ९३ हजार ३५२ वैयक्तिक शौचालय बांधकाम झाले असून, २९ हजार ७३७ शौचालय बांधकाम बाकी आहे. सदर काम फेब्रुवारी अखेर पूर्ण करण्यासाठी शनिवारी सुटी असूनही मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी ग्रामसेवकांचा आढावा घेऊन फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी सक्त ताकीद दिली, तसेच ज्या ग्रामसेवकांचे काम असमाधानकारक आहे, त्यांचे स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी संनियंत्रण करणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. अजूनही मेहकर तालुक्यात ९२१२, चिखली तालुक्यात ६७५८, बुलडाणा तालुक्यात ४२४0, लोणार तालुक्यात ३0७४, मोताळा तालुक्यात २२१९, खामगाव तालुक्यात २२१0, तर सिंदखेड राजा तालुक्यात २0२४ शौचालय बांधकाम बाकी असल्यामुळे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सीईओंनी सांगितले.
विभागात अमरावती जिल्हा प्रथम
१00 टक्के हगणदरीमुक्तीसाठी राज्यात सर्वच जिल्हे प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत १८ जिल्हे हगणदरीमुक्त झाले असून, १९ वा जिल्हा होण्यासाठी अमरावती विभागातील ५ जिल्हे प्रयत्न करीत आहेत. आज रोजी विभागात ९८.३३ टक्के उद्दिष्ट साध्य करीत अमरावती जिल्हा प्रथम, व्दितीय अकोला ९६.0६ टक्के, तृतीय बुलडाणा ९१.७३ टक्के, चवथा वाशिम ८९.२0 व यवतमाळ जिल्हा ८0.१३ टक्के उद्दिष्ट साध्य करीत पाचव्या क्रमांकावर आहे.