बुलडाणा जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचातींसाठी रणधुमाळी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:27 AM2017-12-05T01:27:45+5:302017-12-05T01:33:23+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते  ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात  राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. 

Buldhana district's 43 gram panchayat's election process started! | बुलडाणा जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचातींसाठी रणधुमाळी सुरू!

बुलडाणा जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचातींसाठी रणधुमाळी सुरू!

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग ५ ते ११ डिसेंबरदरम्यान सादर करता येणार नामनिर्देशनपत्र 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते  ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात  राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहे त. 
बुलडाणा जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींची दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक २६ डिसेंबर रोजी होत आहे. सर पंच पद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणुका खर्‍या अर्थाने सरपंच पदाभोवतीच  केंद्रित झाल्या आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ५ ते ११ डिसेंबरदरम्यान सकाळी ११ ते दु पारी ४.३0 पर्यंत सुटीचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र सादर केले जाणार आहेत. १२ डिसेंबर  रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी, १४ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेणे, १४ डिसेंबरला दुपारी  ३.३0 नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. २६ डिसेंबर रोजी मतदान तर २७ डिसेंबर  रोजी निकाल घोषित होणार आहे.  

या ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक
बुलडाणा तालुक्यातील साखळी, घाटनांद्रा, पिंपळगाव सराई, चिखली तालुक्यातील डोंगरशेवली,  करणखेड, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहागीर, धानोरी, मेरा खु., अंबाशी, असोला बु.,  देऊळगावराजा तालुक्यात भिवगाव, दगडवाडी, असोला जहांगीर, मेहकर तालुक्यात कळंबेश्‍वर,  घाटबोरी, चायगाव, जानेफळ, बार्‍हई, बेलगाव, मारोती पेठ, लोणार तालुक्यात दे. वायसा, पारडी,  सोमठाणा, सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद, दरेगाव, पांग्री उगले, तांदुळवाडी, मोहाडी, वडी,  नसिराबाद, मलकापूर तालुक्यात केवळ एकच देवधाबा येथे निवडणूक होत आहे. मोताळा तालु क्यात डिडोळा, गोतमारा, खामगाव तालुक्यात जयपूर लांडे, अटाळी, घारोड, रोहणा, शेगाव  तालुक्यात टाकळी धारव, कालखेड व जळगाव जामोद तालुक्यात निवडी अजमपूर, कुवरदेव,  जामोद या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. 

Web Title: Buldhana district's 43 gram panchayat's election process started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.