Buldhana: अवकाळी पावसात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पळशी बु. शेत शिवारातील घटना
By अनिल गवई | Updated: May 20, 2024 22:25 IST2024-05-20T22:24:31+5:302024-05-20T22:25:22+5:30
Buldhana News: अवकाळी पावसात वीज पडून एका शेतकर्याला आपला जीव गमवावा लागला. ही घडना खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. भगवान भास्कर धनोकार ५० असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Buldhana: अवकाळी पावसात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पळशी बु. शेत शिवारातील घटना
खामगाव - अवकाळी पावसात वीज पडून एका शेतकर्याला आपला जीव गमवावा लागला. ही घडना खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. भगवान भास्कर धनोकार ५० असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक शेतकरी भगवान धनोकार सोमवारी पळशी बु. शिवारातील एका शेतात कामाला गेले होते. दरम्यान, अचानक वादळी वार्यासह परिसरात पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळून या शेतकर्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक शेतकर्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा आप्त परिवार आहे. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच मृतक शेतकर्यांच्या कुटंुबियांनी एकच आक्रोश केला.