बुलडाणा : पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:56 PM2018-06-26T16:56:59+5:302018-06-26T16:58:24+5:30

आठव्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी उपोषण कर्ते व मधुकरराव गवई यांच्याशी चर्चा करून शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

Buldhana: Farmers' hunger strike call off | बुलडाणा : पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे

बुलडाणा : पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे

googlenewsNext
ठळक मुद्देपोषण कर्त्यांचे मधुकरराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या हस्ते निंबू शरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. शेतात जाण्यासाठी शेतरस्ता मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.


बुलडाणा : मधुकरराव गवई यांच्या नेतृत्त्वात  व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव उंडा ता. मेहकर येथील १८ शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी शेतरस्ता मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, आठव्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी उपोषण कर्ते व मधुकरराव गवई यांच्याशी चर्चा करून शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
        उपोषण मागे घेताना अप्पर जिल्हाधिकारी दुबे, पोलिस प्रशासन महसूल विभाग, प्रसाद घेवंदे, बाळासाहेब दळवी, संजय कळसकर उपस्थित होते. शेवटी उपोषण कर्त्यांचे मधुकरराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या हस्ते निंबू शरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. उपोषणकर्ते यांची प्रकृती खालवल्यामुळे पोलिसांनी त्यांना  जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये  दाखल केले. त्यामध्ये सुशीला अंभोरे, नरहरी अंभोरे, रमाबाई अंभोरे, दगडाबाई जाधव यांचा समावेश आहे. उपोषणकर्ते शामराव कव्हळे, दामोधर जाधव, संतोष अंभोरे, दीपक अंभोरे,  भिवसन नाटेकर, विलास कव्हळे, संतोष दशरथ अंभोरे, आकाश नाटेकर, मंदाबाई अंभोरे, सोनाबाई कव्हळे, मलताबाई अंभोरे, लिलाबाई सुखदेव वानखेडे आदी बेमूदत उपोषणाला बसले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Buldhana: Farmers' hunger strike call off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.