Buldhana: शेगाव पालिकेच्या कचरा डेपोला आग
By विवेक चांदुरकर | Updated: May 11, 2024 15:58 IST2024-05-11T15:56:36+5:302024-05-11T15:58:07+5:30
Buldhana News: शेगाव शहराबाहेर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड)ला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Buldhana: शेगाव पालिकेच्या कचरा डेपोला आग
- विवेक चांदूरकर
शेगाव (जि. बुलढाणा) : शहराबाहेर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड)ला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. शहराच्या हद्दीबाहेर नगरपालिकेचे घनकचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड) आहे. त्या ठिकाणी शहरातील संकलित घनकचरा मोठ्या प्रमाणात साठविलेला आहे. त्या कचरा डेपोला १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता अचानकपणे मोठ्या प्रमाणात आग लागली. घटनास्थळी पालिका प्रशासनाच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या १ पाणी टँकरचा वापर करण्यात आला. शेजारीच असणाऱ्या नागरी वस्त्या एसबीआय कॉलनी, आरोग्य कॉलनी, आयटीआय परिसरात आगीचा धूर पसरला होता. कुठलीही जीवितहानी नाही. आग आटोक्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.