बुलडाणा : ४९ लाखांचा गुटखा एफडीएने केला नष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:12 IST2018-01-19T01:12:27+5:302018-01-19T01:12:49+5:30
बुलडाणा: गेल्या वर्षी जिल्हय़ात अन्न व औषध प्रशासनाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेला ४९ लाख ५९ हजार ३६३ रुपयांचा गुटखा गुरुवारी नष्ट केला.

बुलडाणा : ४९ लाखांचा गुटखा एफडीएने केला नष्ट!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या वर्षी जिल्हय़ात अन्न व औषध प्रशासनाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेला ४९ लाख ५९ हजार ३६३ रुपयांचा गुटखा गुरुवारी नष्ट केला.
राज्य शासनाने २0१२ पासून यावर एका अधिसूचनेनुसार बंदी घातली आहे; मात्र छुप्या पद्धतीने तो जिल्हय़ात विक्री होत आहे. त्या पृष्ठभूमीवर एफडीएच्या बुलडाणा कार्यालयाने मे २0१७ पासून आजपर्यंत ३९ धाडींमध्ये जप्त केलेला हा ४९,५९,३६३ रुपये किमतीचा प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा नष्ट केला. पालिकेच्या हनवतखेड येथील डंपिंग ग्राउंडवर तो नष्ट केला गेला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ. साळुंके, सं.ल. सिरोसिया गो.वि. माहोरे, मनीष चौधरी, o्रीकांत मोरे, ढोले जाधव, धकाने आदी उपस्थित होते.