रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 06:20 PM2020-03-24T18:20:54+5:302020-03-24T18:21:05+5:30
सुमारे एक हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
- नीलेश जोशी
बुलडाणा: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाºया संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याकाठी होणाºया सुमारे एक हजार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यासह जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्त संकलनासाठी २६ ते ३० मार्च दरम्यान जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबीरे घेण्यात येत आहे.
कोरोना विषाणूमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन पांढºया पेशांची संख्या कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना रक्ताची गरज भासते, असे माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तसंक्रमण अधिकारी यांनी दिली. त्यामुळे रक्तदान शिबीरे घेण्यासही आता प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही म्हणायला उन्हाळ््यात रक्ताचा तसा नेहमीच तुटवडा असतो. मात्र आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व पातळ््यांवर यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीकोणातून ही भूमिका स्वीकारण्यात आली आहे.
एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जरी विभागाच्या ८०, आॅर्थाेपिडीक्ससच्या ३० यासह प्रसुतीच्या शस्त्रक्रिया मिळून २५० च्या आसपास शस्त्रक्रिया होता. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा विचार करता महिन्याकाठी ही संख्या एक हजार शस्त्रक्रियेच्या आसपास जाते. त्यातच सध्या विषाणूजन्य वातावरण पाहता तसेही शस्त्रक्रिया करणे अडचणीचे असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाची प्रतिकार शक्तीही कमी होते. अशा स्थितीत त्याला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेही एक कारण यामागे आहे, असे डॉ. भागवत भुसारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या शस्त्रक्रिया या इमरजन्सी नाही, त्या काही कालावधीसाठी पुढे ढकल्या जावू शकतात अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.