खून प्रकरणी एकास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:44 PM2020-02-07T15:44:04+5:302020-02-07T15:44:10+5:30

आरोपी अरविंद यास जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावा अशी शिक्षा सुनावली आहे.

Buldhana : life sentence for murder | खून प्रकरणी एकास जन्मठेप

खून प्रकरणी एकास जन्मठेप

Next

बुलडाणा: गावात अकारण बदनामी करत असल्याचा राग मनात धरून खैरव येथील खुशाल विनायक धनवे याचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने खैरव येथील अरविंद गवई (२७) यास जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
अंबाशी खैरव शिवारात नऊ डिसेंबर २०१८ रोजी खुशाल विनायक धनवे याच्या मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर मृतक खुशालचा भाऊ चारुदत्त धनवे, पोलिस पाटील व अन्य दोन ते तीन लोकांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता खुशाल धनवे मृत झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोबतच त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुनाही दिसून आल्या होत्या. प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात चारुदत्त धनवे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान मृतकाची पत्नी रुपाली ही देऊळगाव राजा या आपल्या माहेराहून मृतक खुशाल धनवे याच्या अंत्यसंस्कारासाठी आली असता तीने आठ डिसेंबर २०१२ रोजी अरविंद गवई याने फोनवरून खुशाल धनवेस मद्य प्राशनासाठी नेत असल्याचे सांगितले होते. सोबतच त्याला झटका दाखवतो असा उल्लेखही केला होता. प्रकरणी रुपालीने पुन्हा त्यास फोन केला असता त्याने तो लॉक केला होता. या घटना क्रमाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अरविंद गवई विरोधात खूनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. प्रकरणी पोलिसांनी रुपाली व आरोपी अरविंद यांचाही फोन जप्त करीत घटनास्थळाचा पंचनामा करत प्रकरणात जबाब नोंदविले होते. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
प्रकरणात सुनावणी दरम्यान, न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तक्रारकर्ते चारुदत्त धनवे, जप्ती पंच आणि मृतकाची पत्नी, तपास अधिकारी गुलाबराव वाघ, पोलिस नाईक शरद गिरी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
अंतिम सुनावनी नंतर बुलडाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. के. महाजन यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी अरविंद यास जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावा अशी शिक्षा सुनावली आहे. सोबतच दंडाच्या रकमेपैकी २५ हजार रुपये मृतकाची पत्नी रुपाली धनवे यांना तर २० हजार रुपये मृतकाची आई यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असेही निकालात नमूद करणयात आले आहे.
प्रकरणात वादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी काम पाहले तर पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ, पोलिस नाईक शरद गिरी आणि पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील पवार यांची भूमिका महत्त्वाची राहली.

Web Title: Buldhana : life sentence for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.