बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांना १ लाख २२ हजार मतांची निर्णायक आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:59 PM2019-05-23T18:59:43+5:302019-05-23T19:02:06+5:30

Buldhana Lok Sabha Election Results 2019

Buldhana Lok Sabha Election 2019 live result & winner: Prataprao Jadhav lead by 1 lakh 22 thousand votes | बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांना १ लाख २२ हजार मतांची निर्णायक आघाडी

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांना १ लाख २२ हजार मतांची निर्णायक आघाडी

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रतापराव जाधव यांना ४ लाख ९३ हजार ६ मते मिळाली आहेत.डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ७० हजार ५८५ मते मिळाली आहेत. बळीराम सिरस्कार यांना १ लाख ६३ हजार ३८६ मते मिळाली आहेत.

बुलडाणा: गत विस वषार्पासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. १९ व्या फेरीअखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिंगणे यांच्यावर १ लाख २२ हजार ३२१ मतांची निर्णायक आघाडी घेतल्याने, ते यावेळी खासदारकीची हॅटट्रीक साधण्याच्या उंबरठ्यावर आहेत. प्रतापराव जाधव यांना ४ लाख ९३ हजार ६ मते मिळाली असून, शिंगणे यांना ३ लाख ७० हजार ५८५ मते मिळाली आहेत. वंचित बहूजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना १ लाख ६३ हजार ३८६ मते मिळाली आहेत.
, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात यंदा दुहेरी लढत झाली. वचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार यांनीही या निवडणुकीत चांगली टक्कर दिली आहे.
१९९६ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने १९९६ मध्ये प्रथमच विजय मिळविल्यानंतर काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. १९९८ मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला येथे यश मिळविता आले नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. मात्र त्यांना येथे अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. मतविभाजनाचा युतीच्या उमेदवारांनी येथे सातत्याने फायदा घेतला आहे. २०१९ च्या लढतीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे तब्बल दहा वषार्नंतर आमने सामने आहेत. २००९ मध्ये डॉ. शिंगणेंचा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचेच कृष्णराव इंगळे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव हे दुसर्यांदा खासदार झाले होते. त्यामुळे यंदा १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ मधील जुने खेळाडू नव्याने डाव टाकत आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे जुन्या खेळाडूंच्या नव्या डावपेचात यंदा कोण बाजी मारते याबाबत उत्सूकता आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचीही बुलडाणा लोकसभेतील ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता सर्वसामान्यांना लागली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील युती विरुद्ध आघाडीच्या लढतीचा निकाल जिल्ह्याचे येत्या दहा ते १५ वषार्तील राजकीय ध्रुविकरण स्पष्ट करणारा ठरणार आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.५३ टक्के मतदान झालयं. यात ११ लाख १७ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Web Title: Buldhana Lok Sabha Election 2019 live result & winner: Prataprao Jadhav lead by 1 lakh 22 thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.