बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  मतविभाजनामुळे झाला आघाडीचा गेम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:53 PM2019-05-27T14:53:02+5:302019-05-27T14:53:29+5:30

- नीलेश जोशी  बुलडाणा : आघाडीसाठी गेल्या पाच निवडणुकांपासून मतविभाजनाचा मुद्दा हा डोकेदुखीचा ठरत असतानाच सहाव्या वेळेसही मतविभाजनाचाच फटका ...

Buldhana Lok Sabha Election winner: Division of votes a key factor | बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  मतविभाजनामुळे झाला आघाडीचा गेम!

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  मतविभाजनामुळे झाला आघाडीचा गेम!

Next

- नीलेश जोशी 
बुलडाणा: आघाडीसाठी गेल्या पाच निवडणुकांपासून मतविभाजनाचा मुद्दा हा डोकेदुखीचा ठरत असतानाच सहाव्या वेळेसही मतविभाजनाचाच फटका आघाडीच्या उमेदवाराला बसला. त्यामुळे तिसऱ्या उमेदवाराने घेतलेली मते ही युतीसाठी लाभदायक ठरल्याचे १७ व्या लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत युतीच्या मताधिक्यात ४.३३ टक्क्यांनी घट झाल्याचेही वास्तव अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
१७ व्या लोकसभेत बुलडाणा मतदारसंघात ११ लाख १२ हजार ६७८ वैध मतांपैकी तब्बल दहा लाख ८३ हजार २९४ मते ही प्रमुख तीन उमेदवारांनी घेतली आहे. त्या तुलनेत निवडणूक रिंगणातील उर्वरित नऊ उमेदवारांच्या मतांची बेरीज ही अवघी २९ हजार ३८४ अर्थात २.६४ टक्केच होते. परिणामी बुलडाण्यातील निवडणुकीत तिसरा उमेदवार हा आघाडीच्या पराजयाला तर युतीच्या विजयाला सहाय्यभूत ठरल्याचे चित्र आहे. एकूण वैध मतांच्या तुलनेत १५.५१ टक्के मते ही तिसरा उमेदवार असलेल्या बळीराम सिरस्कार यांनी घेतली आहेत. एकंदरीत बुलडाण्यात वंचित बहुजन आघाडीने आघाडीची निवडणुकीतील समिकरणे बिघडवल्याचे स्पष्ट होत आहे.
१९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे महासिचव मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. मात्र या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहेबराव सरदार यांनी या निवडणुकीत तिसºया क्रमांकाची एक लाख ३३ हजार मते घेतली होती. दुर्देवाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतविभाजनच विजयाच्या आड आले आहे. २००९ मध्ये बसपाच्या रुपाने तिसºया उमेदवाराने ८१ हजार ७६३ मते अर्थात ९.५८ टक्के मते घेतली होती. त्यावेळीही झालेल्या मतविभाजनामुळे आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्येही ७.२५ टक्के मतांचे विभाजन झाले होते. आता २०१९ मध्येही मतविभाजनच आघाडीच्या पराजयास कारणीभूत ठरले असे म्हंटल्यास वावगे होणार आहे.
बुलडाणा शहरात आघाडीला मताधिक्य
बुलडाणा शहरात आघाडीच्या उमेदवाराला एक हजार ६० मतांचा लिड असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान बुलडाणा शहरात ४५.२७ टक्के मतदान झाले होते. अर्थात ७१ हजार २८९ मतांपैकी ३३ हजार तीन मतदारांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मतदान केले होते. यापैकी १४ हजार २८९ मते ही आघाडीच्या पारड्यात पडली तर १३ हजार २२९ मते ही युतीच्या पारड्यात गेली. जवळपास एक हजार ६० मतांचा बुलडाण्यात आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना लीड आहे. लोकसभा निवडणुकीत कित्येक वर्षानंतर आघाडीच्या उमेदवाराला बुलडाणा शहरात ऐवढे मताधिक्य मिळालेले आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत युतीच्या उमेदाराला १३ हजार १०१ तर आघाडीच्या उमेदवाराला ११ हजार ८४५ मते मिळाली होती. जवळपास एक हजार २५६ मते युतीच्या उमेदवाराला गेल्या निवडणुकीत अधिक होती.मात्र या निवडणुकीत ती कमी झाली असल्याचे दिसते.
युतीचे मताधिक्य घटले
२०१४ च्या तुलनेत युतीचे ४.३३ टक्क्यांनी मताधिक्य घटले आहे. युतीला २०१४ मध्ये ५२.०३ टक्के मते मिळाली होती तर २०१९ मध्ये ४६.९१ टक्के मते मिळाली आहे. २०१४ मध्ये युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी १६.३१ टक्के मते अधिक घेत आघाडीच्या उमेदवाराच पराभव केला होता तर २०१९ मध्ये जाधव यांनी ११.९८ टक्के मते घेत आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. हे मताधिक्य पाहता युतीचे मताधिक्य ४.३३ टक्क्यांनी घटले आहे.

Web Title: Buldhana Lok Sabha Election winner: Division of votes a key factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.