बुलढाणा : नीट परीक्षेत कमी गुण; नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 09:10 AM2024-06-24T09:10:06+5:302024-06-24T09:11:19+5:30
जोहना तबस्सुम सै. रियाज (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा : नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शहरातील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. जोहना तबस्सुम सै. रियाज (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शहरातील मच्छी ले-आऊटमध्ये राहणारी जोहना तबस्सुम सै. रियाज ही रविवारी दुपारी जेवायची वेळ झाली तरी खोलीच्या बाहेर आली नाही. तिचे वडील रियाज तिच्या खोलीजवळ गेले असता, दरवाजा आतून बंद होता.
आवाज देऊनही तिने उघडला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला व आत पाहिले असता, जोहना फासावर लटकलेली दिसली. तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नीट परीक्षेत जोहनाला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे ती नाराज होती आणि याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. मृतक जोहनाचे आई-वडील हे बुलढाणा जिल्हा शिक्षक आहेत.