बुलडाणा : सैलानी यात्रेतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:29 AM2018-02-01T00:29:16+5:302018-02-01T00:30:57+5:30

बुलडाणा : सैलानी यात्रेत एकाचा गुप्ती व बर्फ फोडण्याच्या टोचाद्वारे वर्मी वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी दाघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २८ मार्च २0१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. 

Buldhana: The murder of Sailani yatra in the murder case of both! | बुलडाणा : सैलानी यात्रेतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप!

बुलडाणा : सैलानी यात्रेतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप!

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी झाला होता सैलानी यात्रेत खून तिसरा आरोपी फरार!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सैलानी यात्रेत एकाचा गुप्ती व बर्फ फोडण्याच्या टोचाद्वारे वर्मी वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी दाघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २८ मार्च २0१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. 
सैलानी यात्रेच्या शेवटच्या दिवशी संदल सुरू असताना चिखली येथील २९ वर्षीय शेख इम्रान शेख इकबाल याच्यावर इकबाल नगरमध्ये राहणारे अबू बकर ऊर्फ अली खान (वय २८), शेख सद्दाम शेख मेहबूब (वय २७) आणि शेख इरफान ऊर्फ काल्या (वय २८, रा. मिलिंद नगर) या तिघांनी तिक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने वार केले होते. गंभीर जखमी शेख इम्रान याचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होण्याआधीच मृत्यू झाला होता. 
घटना घडतेवेळी शेख इम्रानचे मित्र शेख मुबारक, इम्रान खान आणि अली खान हे घटनास्थळी उपस्थित होते. आपल्या मित्रावर वार होत असताना या तिघांनी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता; परंतु मध्ये पडाल तर तुमचाही मुडदा पाडू, अशी धमकी अबू बकरने या तिघांना दिल्यामुळे ते बाजूलाच थांबले. दरम्यान, न्यायालयात सुनावणीदरम्यान त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
याप्रकरणी रायपूर पोलिसांनी संगनमताने खून केल्याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले होते. सदर खूनप्रकरणी एसडीपीओ बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन ठाणेदार गावंडे तसेच एपीआय जे.एन. सैयद, कोर्ट कामकाज पाहणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल लोखंडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.  त्यांनी अबू बकर आणि सद्दाम यांना अटक केली    होती; परंतु तिसरा आरोपी शेख इरफान अद्यापही फरार आहे. या खूनप्रकरणी ८ जून २0१६ रोजी   जिल्हा न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासले गेले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. अमोल बल्लाळ  यांनी आरोपीविरुद्ध प्रबळ युक्तिवाद केला.
आरोपी अबू बकर हा इतरही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकलेला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत अबू बकर आणि शेख सद्दाम या दोघांना इम्रानच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविले. दोघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावल्याचे निकालात नमूद केले आहे.

Web Title: Buldhana: The murder of Sailani yatra in the murder case of both!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.