Buldhana: रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी, लासुरा फाट्यावरील घटना
By अनिल गवई | Updated: October 9, 2024 18:08 IST2024-10-09T18:08:23+5:302024-10-09T18:08:37+5:30
Buldhana News: रस्ता अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खामगाव शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. यातील एका वृध्द महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Buldhana: रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी, लासुरा फाट्यावरील घटना
- अनिल गवई
खामगाव - रस्ता अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खामगाव शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. यातील एका वृध्द महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
प्राप्तमाहितीनुसार, एमएच २८ टी ३७१६ या ऑटोने काही प्रवासी शेगाव येथून खामगावकडे येत होते. त्यावेळी झालेल्या विचित्र अपघातात ऑटोचा अक्षरक्ष: चुराडा झाला. यात ऑटोचालक चंद्रकांत तुळशीराम पाचपोर (४४, रा. सुटाळपुरा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वैशाली अजय तायडे पुणे, विजय आघाव रा. शेगाव, शालीग्राम पारस्कर रा. वडाळी, नर्मदाबाई धनोकार पळशी बु. असे चार प्रवासी जखमी झाले. यातील नर्मदाबाई धनोकार यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. घटनेनंतर जखमींना तात्काळ खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी एक स्कूल बस रस्त्याच्या कडेला उतरली असून हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.