नवरात्रोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे आॅपरेशन आॅल आऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:12 PM2018-10-10T18:12:30+5:302018-10-10T18:12:58+5:30

बुलडाणा: नवरात्रोत्सवाच्या पृष्ठभूमीवर बुलडाणा पोलिसांनी जिल्ह्यात नऊ आॅक्टोबरला मध्यरात्री संपूर्ण जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅलआऊट’ राबवले.

buldhana Police Operation All Out | नवरात्रोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे आॅपरेशन आॅल आऊट

नवरात्रोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे आॅपरेशन आॅल आऊट

Next

बुलडाणा: नवरात्रोत्सवाच्या पृष्ठभूमीवर बुलडाणापोलिसांनी जिल्ह्यात नऊ आॅक्टोबरला मध्यरात्री संपूर्ण जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅलआऊट’ राबवले. यामध्ये जिल्ह्यातील निगराणी बदमाश तथा संशयीत अशा अनुक्रमे ५७ आणि १७० व्यक्तींची तपासणी करण्यात येऊन जिल्ह्यातील १०५ हॉटेल्सही अचानकपडे झडती घेतली. सण उत्वस गाळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती या आपल्या मुळ गावी येतात किंवा गुन्हा करून लगतच्या जिल्ह्यात आश्रय घेतात. या पृष्ठभूमीवर नवरात्रोत्सवात पोलिसांनी कुठल्याही संभाव्य धोक्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याच्या दृष्टीकोणातून ही मोहिम राबवली. पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी यासंदर्भात आदेशच निर्गमीत केल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आॅपरेशन राबविण्यात आले. नऊ आॅक्टोबरला रात्री सुरू झालेले हे आॅपरेशन आॅल आऊट दहा आॅक्टोबरला सकाळपर्यंत सुरू होते. यामध्ये अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, श्याम घुगे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि बुडाणा जिल्ह्यातील ३३ पोलिस ठाण्याचे ठाणेदार स्वत: यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ५३ महत्त्वाच्या पॉईंटवर बॅरीगेटींसह नाकाबंदीही करण्यात आली होती. अनपेक्षीत पणे करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे जिल्ह्याच पोलिसांच्या कारवाईबाबत चर्चा होत आहे. नाकाबंदीसाठी ४७ अधिकारी व ३१६ कर्मचार्यांची शस्त्रांस नियुक्ती करण्यात आली होती. तसेच स्थानिक पातळीवरही वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस नरीक्षक सुनील अंबुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

६७३ वाहनांची तपासणी

पोलिसांनी यादरम्यान, जिल्ह्यात ६७३ वाहनांची तपासणी करून त्यापैकी ४० वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. सोबतच न्यायालयाने दिलेल्या समन्स तसेच वारंटही विविध व्यक्तींवर तामील करण्यात आले. कारवाई दरम्यान, जिल्ह्यातील १०५ हॉटेल्सचीही झडती घेण्यात आली. लॉज, ढाब्यांचीही तपासणी केली गेली. ५७ निगराणी बदमाश व १७० संशयतीांचीही नाकाबंदी दरम्यान, तपासणी करण्यात आली. दारू बंदीच्याही काही केसेस या कारवाईदरम्यान करण्यात आल्या.

Web Title: buldhana Police Operation All Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.