बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य अंभोरे सक्तीच्या रजेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:26 AM2017-12-23T00:26:52+5:302017-12-23T00:34:13+5:30
बुलडाणा: जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोदर अंभोरे यांचा विद्यार्थ्यांशी अभद्र व्यवहार; तसेच र्मयादा ओलांडून वागण्याच्या प्रकरणी व्यवस्थापनाने कठोर पाऊले उचलीत त्यांना एका महिन्याच्या रजेवर पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोदर अंभोरे यांचा विद्यार्थ्यांशी अभद्र व्यवहार; तसेच र्मयादा ओलांडून वागण्याच्या प्रकरणी व्यवस्थापनाने कठोर पाऊले उचलीत त्यांना एका महिन्याच्या रजेवर पाठविले. विकास कामांच्या तक्रारींना घेऊन त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली असून, समितीच्या अहवालानंतर हे पाऊल उचलले गेले. अंभोरेंच्या जागी प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा.डॉ.ई.जी.हेलगेंकडे सूत्रे आलीत.
गेल्या पंधरवड्यापासून महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मूलभूत सोईसुविधांना घेऊन आंदोलन सुरू केले होते. शुद्ध पाण्याची सोय व्हावी, संगणक दुरुस्त करावीत, व्यायामशाळा सुरु करावी, यासह अन्य मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या. विद्यार्थ्यांचा रोष प्राचार्य डॉ. अंभोरे यांच्या कार्यपद्धतीला होता. यातून महाविद्यालय बंद पाडत विद्यार्थ्यांनी तीन दिवस आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर संस्थेचे सचिव एस. एस. खाडे, नवृत्त न्यायाधीश अँड. ठुसे यांनी तक्रारींची चौकशी केली. केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक वर्गामध्येही अंभोरे यांच्याबद्दल असंतोष होता. प्राध्यापक मंडळी, कर्मचार्यांनी चौकशी अधिकारी खाडे यांच्याकडे गार्हाणे मांडले होते. बुधवारी दिवसभर चौकशी झाल्यानंतर समितीने अहवाल o्री. शिवाजी शिक्षण संस्थाध्यक्ष आणि व्यवस्थापनाला दिला. दरम्यान, संध्याकाळी उशिरा त्या आधारावर व्यवस्थापनाने अंभोरे यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती असून, ३१ जानेवारी २0१८ पर्यंत अंभोरे यांना सक्तीच्या सुटीवर पाठविण्यात आले आहे.