बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:13 AM2023-07-07T09:13:07+5:302023-07-07T09:13:59+5:30

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू

buldhana samruddhi expressway bus accident update driver was drunk dozed off alcohol traces found blood report forensic report | बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

googlenewsNext

Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खूप मोठा बस अपघात झाला. या अपघातात २५-२६ जणांचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघातात विदर्भ ट्रॅव्हल्सची बस दुर्घटनाग्रस्त झाली. बसचालक व वाहक वाचले पण इतर ८ जण जखमी झाले. या संदर्भात अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघाताच्या वेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची अतिशय धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. अपघातावेळी बसचालकाने मद्यप्राशन करून बस चालवल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे.

अपघात मद्यधुंद चालकामुळेच? बसचालकाच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण जास्त

बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल उघड झाल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, अपघाताच्या दिवशी ड्रायव्हर शेख दानिश याच्याकडून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्यतेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होती.

अल्कोहोलचं मान्यताप्राप्त प्रमाण किती?

महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्यताप्राप्त प्रमाण 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे. मात्र, हाती आलेल्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे 1 जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.

बसचालकाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा?

अहवालातील पुराव्यांवरून असे सांगितले जात आहे की, अपघातावेळी ड्रायव्हरला डोळा लागला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला. आयपीसी कलम 304 अन्वये बसचालकावर दोषी हत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हर दानिशच्या रक्त अहवालामुळे त्याला दोषी ठरवलं जाऊ शकतं, परिणामी त्याला 10 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

Web Title: buldhana samruddhi expressway bus accident update driver was drunk dozed off alcohol traces found blood report forensic report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.